उत्तर महाराष्ट्र

नंदुरबार : शिवपुतळ्याच्या मिरवणुकीत कोरोना नियमांचे उल्लंघन, गुन्हे दाखल

सोनाली जाधव

नंदुरबार; पुढारी वृत्तसेवा :  चार दशकांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर शहादा शहरात स्थापन करण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती अश्वारुढ पुतळ्याचे आगमन झाले. यानिमित्त प्रचंड जल्लोषात शहादा वासियांनी काल दिनांक 8 जानेवारी रोजी भव्य मिरवणूक काढली. परंतु कोरोना व ओमायक्रॉनच्या प्रसाराचे भान न ठेवता मनाई आदेशाचे व जमावबंदीचे ऊल्लंघन केले म्हणून या मिरवणुकीत सहभागी झालेल्या राजकीय पदाधिकारी, संघटना व संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि अन्य मिळून शेकडो जणांविरुद्ध तीन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत.

प्रचंड जल्लोष आणि उत्साह

शहादा शहरात भाऊतात्या पेट्रोल पंप डोंगरगाव चौफुली ते शिवतीर्थ या मार्गवर सकाळी 11 पासून सायंकाळी 17.50 पर्यंत चाललेल्या मिरवणुकीत न भूतो न भविष्यती असा प्रचंड जल्लोष आणि उत्साह दिसून आला. हिंदू-मुस्लीम बांधवांसह सर्व जाती-धर्माच्या नागरिकांनी एकत्रितपणे या मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार केला.

तथापि शहादा येथील कोविड भरारी पथकाच्या वतीने कार्यकारी दंडाधिकारी यांचे साहाय्याक तथा मंडळ अधिकारी शिरीषचंद्र गोटू परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मकरंद नगीन पाटील, अभिजीत मोतीलाल पाटील, अनिल भिमराव भामरे, निलेश दत्तात्रे पाटील, अॅड, सरजु साहेबराव पाटील, रमाशंकर माळी, राजा उर्फ राजेंद्र दिलीप साळी, संजय चौधरी, अरविंद कुवर, किशोर साहेबराव पाटील, मुनेश जगदेव, गणेश रघुनाथ पाटील, सागर मगन मराठे, राजेंद्र अग्रवाल, सुनिल काशीनाथ पाटील, सुनिल पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष, विनोद जैन, पंकज सोनार, संतोष वाल्हे, गोपाल गांगुर्डे, विजय पाटील, सुरेंद्र कुवर, हितेंद्र वर्मा, रुपेश कोळी, कार्तिक नाईक, कैलास युवराज सोनवणे, शिवाजी मोतीराम पाटील, श्याम जाधव, शुभम चौधरी, लाला पाटील, वैभव तांबोळी, मनिष चौधरी, दिनेश नेरपगार, सोनु पाटील (चहावाला), अप्पु पाटील, गुडडु पवार, आदीत्य डोडवे, सतिष मराठे, बबलु फेटेवाला तसेच इतर 100 ते 125 जणांवर भादवि कलम- 188,268,269, सह महा पोलीस का कलम 37 (1) (3) चे उल्लंघन केल्याप्रकरणी कलम 135,112,117 व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 बी प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला.

डीजे लावून ध्वनीप्रदूषण करुन तसेच फटाके फोडून जमाव जमवून, आरडाओरडा करुन विनापरवागी मिरवणूक काढून सार्वजनिक शांततेचा भंग करीत जिल्हाधिकारी यांच्या कोरोना/ऑमायक्रॉन विषयक मनाई आदेशाचे व जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले व सार्वजनिक उपद्रव करतांना आढळले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीस प्रशासनाने म्हटले आहे.

हे पाहा : कोरोनाचा Heart Attack आणि Brain Hemorrhageशी काय संबंध?

SCROLL FOR NEXT