जळगाव; पुढारी वृत्तसेवा: चाळीसगाव तालुक्यातील २८ वर्षीय शेतमजूर तरुणाला लग्न लावून देण्याचे आमिष दाखवून २ लाख रुपये व सोन्याचे दागिने घेऊन दोन जण पसार झाले आहे. त्याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील डामरूण येथील २८ वर्षीय तरूण शेती करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतो. दरम्यान औरंगाबाद येथील आशा संतोष शिंदे आणि किरण भास्कर पाटील उर्फ बापू पाटील ( रा. आमडदे ता. भडगाव) यांनी तरुणाचे लग्न लावून देतो असे आमिष दाखवले.
याशिवाय तरुणाकडून २ लाख रूपये रोख व ४० हजार रूपयांचे दागिने २० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान घेवून पसार झाले.
याप्रकरणी तरुणाच्या फिर्यादीवरून चाळीसगाव पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचलंत का?
पाहा व्हिडिओ : राजू शेट्टी – पवारांच्या त्या भिजलेल्या सभेनंतर शेतकरी ढेकूळ विरघळल्याप्रमाणे विरघळला