बीड : राक्षसभूवन येथे अवैध वाळूचे ५ ट्रक तहसीलदारांनी पकडले - पुढारी

बीड : राक्षसभूवन येथे अवैध वाळूचे ५ ट्रक तहसीलदारांनी पकडले

गेवराई ; पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील राक्षसभूवन येथे आज (मंगळवार) सकाळी येथील गोदापात्रातून अवैध वाळू हायवा ट्रक मधून घेऊन जात असल्याची माहिती तहसीलदारांना खबऱ्यामार्फत मिळाली. यानंतर तहसीलदारांनी पथकासह त्या ठिकाणी दाखल होऊन पाच हायवा ट्रक जप्त केले.
या प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार सचिन खाडे यांनी दिली आहे.

या कारवाईमध्ये दीड कोटींचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती तहसीलदारांनी दिली. या कारवाईमुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाळू माफियांचे धाबे दणाणले असून, या पकडलेल्या हायवावर नेमकी काय कारवाई केली जाते याकडे लक्ष लागले आहे.

सदरच्या पाच हायवा गाड्यांपैकी एका वाहनाच्या चालकाने पलायन केले असल्याने ही गाडी घटनास्‍थळावरच आहे.

तसेच त्या ठिकाणी महसुल व पोलिस कर्मचारी उपस्थित आहेत. उर्वरित चार गाड्या ह्या तहसिल कार्यलयात आणल्या असल्याचे देखील तहसिलदार यांनी सांगितले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून महसूल प्रशासनाच्या हातावर तुरी देऊन तालुक्यातील राक्षसभूवन शनिचे या ठिकाणी अवैध वाळू उपसा करून त्याची तस्करी करण्यात येत होती.

परंतू प्रशासन पोहोचेपर्यंत वाळू वाहतूकी करणारे पळून जाण्यात यशस्‍वी ठरत होते. त्‍यामुळे पहाटे पासूनच गेवराई महसूलचे तहसिलदार सचिन खाडे व त्यांचे सहकारी वाळू वाहतूकदारांना पकडण्यासाठी दबा धरून बसले होते. सदरच्या पाच हायवा एकापाठोठ गोदापात्रात उरल्यानंतर महसूल पथकाने त्यांना पकडले.

याच ठिकाणी तहसीलदारांनी काही दिवसांपुर्वी सतरा हायवा गाड्या पकडल्या होत्या आणि आज पाच हायवा पकडल्या आहेत.

यामध्ये एकूण दीड कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, ही सर्व वाहने तहसील कार्यलयात आणली आहेत.

Back to top button