उत्तर महाराष्ट्र

नाशिक : वाहनचोरी करणारे दोघे भाऊ जेरबंद

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरात दुचाकी वाहने चोरी करणार्‍या दोघा भावांना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने जेरबंद केले आहे. अतुल भाऊसाहेब पगार (27) व कृष्णा भाऊसाहेब पगार (25, दोघे रा. त्रिमूर्तीनगर, जेलरोड) अशी पकडलेल्या संशयितांची नावे आहेत.

शहरात वाहनचोरीचे प्रकार वाढल्याने पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेण्यासाठी मोहीम आखली होती. गुन्हे शाखा युनिट एकचे अंमलदार योगीराज गायकवाड यांना दुचाकी चोरट्यांची माहिती मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी विष्णू उगले, अंमलदार अनिल दिघोळे, सुरेश माळोदे, गायकवाड, रामदास भडांगे, रावजी मगर, अण्णासाहेब गुंजाळ यांच्या पथकाने नांदूरगाव येथून दोघा भावांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत, त्यांनी शहरातील उपनगर, आडगाव, नाशिकरोड पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून चार दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोघेही संशयित सराईत गुन्हेगार असून, त्यांच्याविरोधात या आधी म्हसरूळ, नाशिकरोड, पंचवटी पोलिस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT