उत्तर महाराष्ट्र

नाशिक : पाश्चिमात्य देशांची जिवनशैली स्विकारल्याने हृदय विकारात वाढ

अंजली राऊत

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
भारतातील तरुण पिढीने पाश्चिमात्य देशांची जिवनशैली चुकीच्या पध्दतीने स्विकारलेली आहे. तेथील हवामान, वातावरण, जीवन जगण्याची पध्दत, आहार अन जडणघडण भारतापेक्षा भिन्न आहे. तेथील नागरिकांना अनुकूल असलेली जीवनशैली भारतातील नागरिकांना अनुकूल नाही. त्याचा परिणाम शरीरावर होत असून हृदय विकारात वाढ होत आहे, असे प्रतिपादन प्रसिध्द हदयविकार तज्ज्ञ डॉ. हिरालाल पवार यांनी केले.

येथील श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयात प्राध्यापक प्रबोधिनी अंतर्गत शुक्रवारी (दि. 21) शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी प्रसिध्द हदयविकार तज्ज्ञ डॉ. हिरालाल पवार यांचे 'हृदय विकार: कारणे आणि उपाय' या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शालेय समितीचे अध्यक्ष विलास धुर्जड होते. तर व्यासपीठावर विकास समितीचे सदस्य रमेश धोंगडे, कौशल्या मुळाणे, सुनिता आडके, शिवाजीराव गायधनी, ॲड. अशोक आडके, ॲड. त्र्यंबक गोडसे, माणिकराव गोडसे, प्राचार्य डॉ. एस. एस. काळे, उपप्राचार्य एस. के. शिंदे आदी मान्यवर होते. पाहुण्यांचा परिचय उपप्राचार्य डॉ. एस. के. शिंदे यांनी करुन दिला. पवार म्हणाले की, भारतीय नागरिकांनी भारत भूमिच्या ऋतुमान, आहार विहाराचा विचार करून जीवनशैली अवलंबवली पाहीजे, व्यसनांपासून दूर राहीले पाहीजे, ताणतणाव न घेता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेवून उपचार केले पाहीजे. पूर्वकाळजी घेतल्यास कोणताही आजार हा ठिक होतो. नियमितपणे व्यायाम व विश्रांती घेणे आवश्यक आहे. हृदय विकाराची लक्षणे सविस्तर विविध उदाहणांसह सांगीतले. कार्यक्रमाचे अध्यक्ष शालेय समितीचे अध्यक्ष विलास धुर्जड म्हणाले की, जागतिक वातावरणात सतत होणारा बदल हा मानवाच्या शरीरावर विपरित परिणाम करत आहे. त्यामुळे विविध आजार वाढतांना दिसतात. प्रास्ताविक भाषणात बोलतांना प्राचार्य डॉ. एस. एस. काळे यांनी सांगितले की, नोकरदार वर्गाला आजच्या धकाधकीच्या जिवनात आरोग्याच्या समस्या भेडसावत आहे. त्यातच हृदय विकाराचे रुग्णांची संख्या अधिक असते, ते टाळण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला वेळेत घ्यायला हवा. डॉ. जयश्री जाधव यांनी सुत्रसंचलन केले. डॉ. सुनिल सौदाणकर यांनी आभार मानले.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT