उत्तर महाराष्ट्र

सुरगाणा नगरपंचायत : अध्यक्षपदी शिवसेनेचे भरत वाघमारे तर माकपच्या माधवी थोरात उपाध्यक्षपदी

गणेश सोनवणे

सुरगाणा पुढारी वृत्तसेवा : सुरगाणा नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला असून अध्यक्षपदी शिवसेनेचे भरत वाघमारे तर माकपच्या माधवी थोरात यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.

सुरगाणा नगरपंचायतीत भाजप ८, शिवसेना ६, माकप २, राष्ट्रवादी १ असे पक्षीय बलाबल होते. पैकी भाजपच्या नगरसेविका कासूबाई नागू पवार यांचे निवडणूकी आधी दोन दिवसांपूर्वी निधन झाल्याने भाजपचे संख्याबळ ७ नगरसेवक असे झाले होते.

भाजपला राष्ट्रवादीने साथ दिल्याने ८ तर शिवसेनेला माकपने साथ दिल्याने ८ असे समसमान संख्याबळ झाल्याने अखेर चिठ्ठी उचलत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. अध्यक्ष पदासाठी शिवसेनेतर्फे भरत वाघमारे तर भाजपच्या वतीने विजय कानडे यांनी उमेदवारी अर्ज भरले होते. अध्यक्ष पदासाठीची चिठ्ठी भुमिका काळू ठाकरे या बालिकेच्या हस्ते उचलण्यात आली. यामध्ये भरत वाघमारे यांची चिठ्ठी निघाल्याने अध्यक्षपदी भरत वाघमारे यांची वर्णी लागली तर उपाध्यक्ष पदा करीता माकपच्या माधवी राहुल थोरात व राष्ट्रवादीच्या जयश्री मनोज शेजोळे यांनी अर्ज दाखल केला होता. यामध्ये हर्ष दीपक चौरे या मुलाने चिठ्ठी उचलली असता माकपच्या माधवी राहुल थोरात यांची चिठ्ठी निघाल्याने उपाध्यक्ष पदी निवड झाली आहे.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी बबनराव काकडे, तहसिलदार सचिन मुळीक, कळवणचे पोलिस उपविभागीय अधिकारी अमोल गायकवाड, वाणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील रजपूत, बा-हे पोलिस निरीक्षक अनिल वाघ, निलेश बोडके, सागर नांद्रे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT