लासलगाव : पुढारी वृत्तसेवा
येथील सुमननगर भागातील एका बंगल्यात जागृती सुनील काळे (27) या विवाहितेने घरातील पंख्याला साडीने गळफास घेतल्याने (Suicide) तिचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सुमननगर भागात सुनील काळे हे कांदा खरेदी करून किरकोळ विक्रीचा व्यवसाय करतात. शनिवारी पहाटे 5.30 ते 6 च्या सुमारास जागृती सुनील काळे यांनी फॅनला गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली. (Suicide)
याबाबत माहिती मिळताच लासलगावचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ तसेच पोलिस उपनिरीक्षक अजिनाथ कोठुळे, सहायक पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र अहिरे, हवालदार नंदकुमार देवडे, संदीप शिंदे, प्रदीप आजगे व सुजय बारगळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. या विवाहितेस आठ वर्षांचा मुलगा देखील आहे. लासलगाव पोलिस कार्यालयात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.(Suicide)