उत्तर महाराष्ट्र

दिंडोरीच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या मेघा धिंदळे तर उपनगराध्यपदी राष्ट्रवादीचे जाधव

गणेश सोनवणे

दिंडोरी पुढारी वृत्तसेवा : दिंडोरी नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तीघाही पक्षांनी एकत्र येत सत्ता मिळवली असून नगराध्यक्ष पदी शिवसेनेच्या मेघा धिंदळे तर उपनगराध्यक्ष पदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अविनाश जाधव यांची निवड झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी निलेश श्रींगी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी नागेश येवले यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष निवडीसाठी विशेष सभा झाली.

नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेच्या मेघा धिंदळे व भाजपच्या आशा कराटे यांच्यात लढत झाली. धिंदळे यांना 13 तर भाजपच्या आशा कराटे यांना 4 मते मिळाली. तर उपनगराध्यक्ष पदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अविनाश जाधव यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.

प्रसंगी शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नगरसेवक भगवे फेटे घालून सभागृहात दाखल झाले होते. नगराध्यक्ष मेघा धिंदळे यांनी दिंडोरीचे सुपुत्र जवान प्रसाद क्षीरसागर यांना वीरमरण आल्याने त्यांचे श्रद्धांजली ची सूचना मांडली व त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. नवनिर्वाचित नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष यांचा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सत्कार केला तसेच नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाचा सत्कार केला. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. वीर जवान क्षीरसागर यांच्या दुःखद घटनेमुळे कोणताही जल्लोष करण्यात आला नाही. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, माजी आमदार रामदास चारोस्कर यांनी एकत्र येत महाविकास आघाडी करत सत्ता मिळवून प्रतिष्ठा कायम राखली आहे.

हेही वाचा ;

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT