उत्तर महाराष्ट्र

शिवजयंती – 2023 : आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सेनानी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज – प्रदिप सावळे

अंजली राऊत

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा

कर्म आ. मा. पाटील कला वाणिज्य आणि कै. अण्णासाहेब एन. के. पाटील विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय पिंपळनेर येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिवाजी महाराज हे एक आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सेनानी होते प्रत्येक घरात महाराजांच्या विचारांचे पारायण झाले तर देश खऱ्या अर्थाने प्रगतीपथावर जाईल. असे प्रतिपादन प्रदीप सावळे यांनी केले.

व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य के. डी. कदम तर डॉ. वाल्मिक शिरसाठ हे अध्यक्षस्थानी उपस्थित होते.  प्रमुख वक्ते म्हणून इतिहास विभागाचे प्राध्यापक प्रदिप सावळे बोलत होते. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्र करून हिंदवी स्वराज्य स्थापन केले. माणसांची पारख करण्याची कला महाराजांच्या अंगी असल्यामुळे असंख्य तरुणांना स्वराज्य स्थापन करणे कामी प्रोत्साहित केले. सती प्रथा बंद करण्यामागे महाराजांचा सिंहाचा वाटा होता. शुद्धीकरणाची चळवळ ही महाराजांनी सुरू केली होती शेतकऱ्यांसाठी त्यांनी अनेक सुधारणा करून विविध योजना देखील राबविल्या ते पर्यावरण प्रेमी होते. छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त महाविद्यालयातील विद्यार्थिनी प्राची पाटील हिने शिवरायांविषयी भाषण केले. इंग्रजी विभागप्रमुख प्राध्यापक चंद्रकांत घरटे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. डॉ. योगेश नांद्रे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक उगलमुगले प्रा. वसावे, डॉ. मस्के, प्रा. गवळी तसेच शिक्षकेतर कर्मचारी लक्ष्मीकांत पवार, मनोहर बोरसे, संदीप अमृतकर, नरेंद्र ढोले, ताराचंद चौरे, कैलास जिरे, कुणाल कुवर, रखमाप्पा गवळी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्र. प्राचार्य के. डी. कदम, प्रा. सी. एन. घरटे व शिक्षकेतर कर्मचारी प्रयत्नशील होते.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT