Gujarat : पुतण्याच्या लग्नात माजी सरपंचाचा पैशांचा पाऊस | पुढारी

Gujarat : पुतण्याच्या लग्नात माजी सरपंचाचा पैशांचा पाऊस

पुढारी ऑनलाईन डेस्क : तुम्ही लग्नाच्या हटके किस्स्यांच्या गोष्टी. शाही लग्न, लग्नातील लवाजमा, लग्नातील गमती-जमती आदी गोष्टी पाहिल्या असतील पण कधी पाहिलं आहे का? लग्नात चक्क पैशांचा वर्षाव. तर अशी एक घटना घडली आहे गुजरातमध्ये. एका माजी सरपंचाने आपल्या पुतण्याच्या लग्नात चक्क पैशांचा वर्षाव केला आहे. वाचा सविस्तर बातमी. (Gujarat)

माहितीनुसार, गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यात एका लग्नाच्या कार्यक्रमात गावच्या माजी सरपंचाने आपल्या घराच्या वरच्या भागातून रोख रकमेचा वर्षाव करत पैशांचा पाऊस पाडला आहे. या माजी सरपंचाचं नाव आहे करीम यादव. ते केकरी तहसीलमधील आगोल गावचे माजी सरपंच आहेत. त्यांच्या पुतण्याच्या लग्नात त्यांनी केलेल्या कृतीमुळे ते चर्चेचा विषय ठरले आहेत. त्यांनी आपला पुतण्या रझाक याच्या लग्नात घराखाली जमा झालेल्या लोकांच्या अंगावर चक्क ५०० रुपयांच्या नोटांचा वर्षाव केला आहे. रझाकची लग्नाच्या वरातीत होता तेव्हा करीम यादव आणि त्यांच्या कुटुबीयांनी खाली मिरवणुकीत असलेल्या लोकांच्यावर पैश्यांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली.

Gujarat : व्हिडिओ व्हायरल

करीम यादव व त्यांचे कुटुंबीय लोकांवर पैश्यांचा वर्षाव करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये लोक अंगावर पडलेले पैसे गोळा करताना मश्गुल दिसत आहेत. तर मिरवणुकीतील “अझीम-ओ-शान शहेनशाह” हे बॉलिवूडचे गाणे ऐकू येत आहे.

हेही वाचा

Back to top button