उत्तर महाराष्ट्र

जळगाव : मद्यपी दुचाकीस्वाराच्या धडकेत गर्भवतीचा मृत्यू

निलेश पोतदार

गर्भवती महिला दोन्ही नणंदांसह रस्त्यावर शतपावली करीत होती. यावेळी मद्यधूंद दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेत गर्भवतीचा मृत्यू  झाला. ही धक्‍कादायक घटना तालुक्यातील वावडदा येथे घडली. या प्रकरणी दोषींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही, ताेपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही, असे कुटुंबियांनी स्‍पष्‍ट केल्‍याने नकार दिल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले.

पोलीस सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, तालुक्यातील वावडदा येथील ज्योती दीपक गोपाळ (वय २१) या आपल्या मीनी आणि दीपाली या दोन्ही नणंदांसोबत वावडदा ते म्हसावद या रोडवर शतपावली करत होत्या.  या वेळी सुपडू विक्रम जाधव (रा. वावडदा, ता. जळगाव) हा दुचाकीस्वार भरधाव वेगाने आला. त्याने ज्योतीला मागील बाजूने जोरदार धडक दिली. तिला सुमारे २५ फुटांपर्यंत फरफटत नेले. यामध्‍ये ज्‍याेती गंभीर जखमी झाल्‍या. उपचार सुरू असताना त्‍यांचा मृत्यू झाला. दरम्यान, संबंधीत दुचाकीस्वार हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचे दिसून आले. आज सकाळी ज्योती गोपाळ हीचा मृतदेह जिल्हा रूग्णालयातून स्वीकारण्यास तिच्या कुटुंबियांनी नकार दिला आहे.

ज्‍याेतीच्‍या मृत्‍यूस कारणीभूत ठरलेल्‍या दुचाकीस्‍वारवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येणार नाही, तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही, असा पवित्रा कुटुंबीयांनी घेतला.

हेही वाचलं का?

SCROLL FOR NEXT