पिंपळनेर : निजामपूर पोलीस ठाण्यात घेण्यात आलेल्या बैठकीप्रसंगी मार्गदर्शन करताना सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड.  (छाया : अंबादास बेनुस्कर) 
उत्तर महाराष्ट्र

पिंपळनेर : एक कॅमेरा पोलिसांसाठी अभियानाची सुरुवात

अंजली राऊत

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील निजामपूर जैताणे परिसरात वाढत्या चोऱ्यांचे सत्र थांबावे व जातीय सलोखा टिकून रहावा याकरीता निजामपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये निजामपूर जैताणे गावातील राजकीय, सामाजिक तथा व्यापारी क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीप्रसंगी सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी वाढत्या चोऱ्याबद्दल उपाययोजना सांगितल्या. पोलिसांकरीता सर्व व्यापारी, बँका, पतसंस्था, दुकाने, ज्वेलरी शॉप यांनी प्रथम एक कॅमेरा बसवावा. जेणेकरून चोरीच्या घटनांना आळा बसेल व घटना घडल्यास चोरांच्या मुसक्या आवळण्यास मदत होईल. सध्यस्थितीत जातीय तणाव निर्माण करण्याचे कार्य काही घटक करत असून सर्वांनी शांतता अबाधित ठेवावी. निजामपूर पोलीस दल सक्षम असून गुन्हेगारांची गय केली जाणार नाही. तसेच आपण सर्वांनी कसल्याही अफवा व सोशल मीडियावरील घटनांचा अपप्रचार करू नये असे आवाहन गायकवाड यांनी यावेळी केले. प्रा. भगवान जगदाळे, रघुवीर खारकर, मा. सरपंच संजय खैरनार, रविंद्र जाधव, सागर बोरसे आदींनी मनोगत व्यक्त केले. बैठकीस पोलीस उपनिरीक्षक काळे, सरपंच अजितभाई शाह, सरपंच प्रतिनिधी भूषण वाणी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र शाह, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष विजय रेलन, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख प्रकाश पाटील, भालचंद्र कोठावदे, समता परिषद जिल्हाध्यक्ष राजेश बागूल, निजामपूर ग्राम पंचायत सदस्य ताहीर मिर्झा, महेंद्र वाणी, राजेंद्र शाह, डॉ. मनोज भागवत, विकासो माजी चेअरमन शांतिलाल भदाणे, दिलीप वाणी, विपुल विसपुते, हस्ती बँक व्यवस्थापक पराग शाह, परवेझ सैय्यद, अकबर पिंजारी, अनिल राणे व व्यापारी तथा सर्व क्षेत्रातील नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT