उत्तर महाराष्ट्र

पिंपळनेर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचास जीवे ठार मारण्याची धमकी, गुन्हा दाखल

गणेश सोनवणे

पिंपळनेर: पुढारी वृत्तसेवा : कार्यालयीन कामकाजासाठी अनामत रकमेची पावती, कोणत्या कारणासाठी अनामत रक्कम घेतली ती माहिती व बँक स्टेटमेंट मागितल्याने त्याचा राग येऊन उपसरपंच विजय गांगुर्डे यांना शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ग्रामपंचायत सदस्या सुनीता रवींद्र सोनवणे यांचे पती रवींद्र परबत सोनवणे यांनी ही धमकी दिली आहे.  याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय साहेबराव गांगुर्डे यांनी ग्रामविकास अधिकारी सुनील पवार यांना अर्ज देत ग्रामपंचायत सदस्या सुनीता रवींद्र सोनवणे यांचे पती रवींद्र परबत सोनवणे यांची अनामत रक्कम २० हजार दि.११ सप्टेंबर २०१८ ची अनामत दि. ७ जानेवारी २०२२ ला परत केली. त्याबाबत धनादेश क्र. ९६७७३ बाबतची माहिती, त्याची अनामत रकमेची पावती व काय कारणासाठी अनामत रक्कम घेतली ती माहिती ११ सप्टेंबर २०१८ ते १२ सप्टेंबर २०१८ ची बँक स्टेटमेंट मिळण्याची मागणी उपसरपंच विजय गांगुर्डे यांनी ग्रामपंचायत सदस्यांचे पती रवींद्र सोनवणे यांना मंगळवारी अर्ज देऊन केली. याचा राग आल्याने यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. शिवराळ भाषा वापरत जीवे ठार मारण्याची धमकी उपसरपंच विजय गांगुर्डे यांना दिली. या संदर्भात उपसरपंच विजय गांगुर्डे यांनी पिंपळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने भादंवि कलम ५०४, ५०६ प्रमाणे रवींद्र सोनवणे यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून पुढील चौकशी पी. डी. अमृतकर हे करीत आहेत.

पिंपळनेर ग्रामपंचायतीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार
धुळे जिल्ह्यात सर्वात मोठी समजली जाणा-या पिंपळनेर ग्रामपंचायतीत मोठा भ्रष्टाचार झाला असून ग्रामविकास अधिकारी डि. डि. चौरे निलंबित आहेत. याप्रकरणाची चौकशी होत आहे व या संदर्भात लवकरच कारवाई होईल. केवळ एका धनादेशाची माहिती मागितल्याने जीवे मारण्याची धमकी दिली गेल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार करणार असल्याची माहिती उपसरपंच गांगुर्डे यांनी दिली.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT