उत्तर महाराष्ट्र

जळगाव : आषाढी एकादशीनिमित्त संत मुक्ताबाई समाधीस्थळी सव्वा क्विंटल खजूराची आरास

अनुराधा कोरवी

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : मुक्ताईनगर तालुक्यातील श्रीक्षेत्र कोथळी येथील श्री. संत मुक्ताबाई समाधीस्थळी आषाढी एकादशीनिमित्ताने माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांच्या शेतातील सुमारे सव्वा क्विंटल खजुराची आकर्षक आरास करण्यात आली.

ज्या भाविकांना पंढरपूरला विठू- माऊलीच्या दर्शनासाठी जाता आले नाही, अशा पंचक्रोशील अनेक भाविकांनी कोथळी येथील श्री. संत मुक्ताबाई समाधीस्थळी दर्शनासाठी गर्दी केली. आज देवशयनी आषाढी एकादशीनिमित्ताने श्री. संत मुक्ताई मुळमंदिरात पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा दर्शनासाठी लागल्या होत्या. संदीप महाराज मोतेकर यांनी मंगल काकड आरती व महापूजा केली.

जे भाविक आषाढी एकादशीला पंढरपूरला जाऊ शकत नाहीत, त्यानी मुक्ताईचे दर्शन घेतल्यास पांडुरंगाचे दर्शन होते अशी ख्याती आहे. दिवसभर हजारो भाविकांनी दर्शन घेतले. सकाळी पाऊस आल्याने भाविक दर्शनाचा आनंद द्विगुणित झाला. दरम्यान आमदार एकनाथ खडसे यांच्या शेतातील सव्वा क्विंटल बरई खजुराची आरास भाविकांचे लक्ष वेधून घेतले. याठिकाणी दिवसभरात दुपारी प्रवचन, किर्तन, रात्री हरिजागर आदी कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT