मुंबई : खासदार संजय राऊत यांच्या वाढदिसानिमित्त सत्कार करताना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, माजी नाशिक जिल्हा शिवसेना प्रमुख दत्ता गायकवाड, महनगर प्रमुख सुधाकर बडगुजर आदी.  
उत्तर महाराष्ट्र

अभीष्टचिंतनदिनी नाशिकच्या एकनिष्ठ शिवसैनिकांचे खा. राऊत यांच्याकडून कौतुक

अंजली राऊत

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची मुलुख मैदान तोफ आणि पक्षप्रमुखांचे उजवे हात म्हणून ओळखले जाणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व खा. संजय राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईला जाऊन नाशिकच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभीष्ठचिंतन केले. यावेळी 40 आमदारांनी गद्दारी करून पक्ष सोडला तरी नाशकात मात्र त्याची विशेष झळ बसू न दिल्याबद्दल राऊत यांनी नाशिकच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांचे तोंडभरून कौतुक केले आणि अशीच एकजूट कायम ठेवून उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करा,असे राऊत यांनी सांगितले.

अभीष्टचिंतन करणाऱ्यांमध्ये जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, नाशिक महापालिकेचे माजी विरोधीपक्षनेते अजय बोरस्ते, डी.जी.सूर्यवंशी आदी उपस्थित होते. तसेच नाशिकला मी लवकरच भेट देईन आणि असे सांगून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्वत्र पक्षाचा भगवा फडकवण्यासाठी सज्ज राहा असेही खा. राऊत यांनी सांगितले. नाशिकला पक्षाचा जो विस्तार झाला आणि आणि शिवसैनिकांची एकजूट टिकून राहिली ती आपल्या संघटन कौशल्यामुळे याची आठवण नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी राऊत यांना करून दिली. आपल्या दौरे तसेच घणाघाती भाषणाने शिवसैनिकांत कमालीचा उत्साह संचारतो. त्यामुळे नाशिकला वारंवार भेटी देत जा. अशी विनंतीही नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी केली असता राऊत यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT