Murder Case | बहिणीच्या प्रियकराची भावाकडून हत्या (Pudhari File Photo)
नाशिक

Nashik Road Murder Case |"पतीच्या चारित्र्यावर संशय अन् पत्नीने घेतला जीव! नाशिकच्या गंगापूर रोडवरील धक्कादायक घटना"

Nashik Road Murder Case | गंगापूर रोडवरील गुरुजी हॉस्पिटलच्या बांधकाम साईटवर राहणाऱ्या मजूर दाम्पत्यातील कौटुंबिक वादाचे पर्यावसान खुनात झाले.

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गंगापूर रोडवरील गुरुजी हॉस्पिटलच्या बांधकाम साईटवर राहणाऱ्या मजूर दाम्पत्यातील कौटुंबिक वादाचे पर्यावसान खुनात झाले. पतीच्या चारित्र्यावर संशय घेत पत्नीने त्याचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी आशा कोल (वय ३४) हिला अटक केली असून, संतोष भोराई कोल (वय ३७) याचा मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुजी हॉस्पिटलच्या बांधकाम साईटवर काम करणारे संतोष व आशा कोल यांच्यात चारित्र्याच्या संशयावरून वारंवार वाद होत होते. घटनेच्या दिवशीही दोघांमध्ये जोरदार भांडण झाले.

त्यानंतर संतोष झोपल्यानंतर आशाने त्याचा गळा आवळून खून केला. दुसऱ्या दिवशी सकाळी संतोष झोपेतून उठत नसल्याचे सांगत त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात नेऊन नैसर्गिक मृत्यू झाल्याचा बनाव करण्याचा प्रयत्न केला.

मात्र वैद्यकीय तपासणीदरम्यान मृत्यू संशयास्पद असल्याचे स्पष्ट झाल्याने गंगापूर पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी आशाची कसून चौकशी केली असता तिने पतीचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर तिला अटक करण्यात आली.

या घटनेमुळे बांधकाम साईटवरील कामगारांमध्ये मोठी खळबळ उडाली असून गंगापूर पोलीस ठाण्याचे पथक या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT