Pregnancy Fraud Pudhari
नाशिक

Fertility Issues | रिपोर्ट्स नॉर्मल असूनही गर्भधारणा का होत नाही?

Fertility Issues | डॉ. मळगांवकर यांनी मांडले अनएक्सप्लेण्ड इनफर्टिलिटीमागचे वास्तव

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आजच्या धावपळीच्या युगात अनेक जोडप्यांना सर्व प्राथमिक वैद्यकीय रिपोर्ट नॉर्मल असूनही वंध्यत्वाचा सामना करावा लागत आहे. वैद्यकीय भाषेत याला अनएक्सप्लेण्ड इनफर्टिलिटी अर्थात अस्पष्ट वंध्यत्व, असे म्हणतात. या गंभीर विषयावर प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरचे प्रसिद्ध वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉ. नरहरी मळगांवकर यांनी मोलाचा प्रकाश टाकला आहे.

डॉ. मळगांवकर यांच्या मते, केवळ रिपोर्ट्स नॉर्मल असणे म्हणजे सर्व काही व्यवस्थित आहे असे नाही. साध्या तपासण्यांमध्ये न दिसणारे अनेक सूक्ष्म अडथळे गर्भधारणेत मोठी अडचण ठरू शकतात.

यात प्रामुख्याने स्त्रीबीजाची सूक्ष्म गुणवत्ता, फॅलोपिअन ट्यूबची अंतर्गत कार्यक्षमता, गर्भाशयात भ्रूण रुजण्याच्या प्रक्रियेतील त्रुटी या अदृश्य कारणांचा समावेश होतो. आधुनिक वैद्यकीय विज्ञानामुळे आता अशा सूक्ष्म कारणांचा शोध घेणे शक्य झाले आहे.

प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरमध्ये अशा गुंतागुंतीच्या प्रकरणांवर प्रगत तंत्रज्ञान आणि सखोल विश्लेषणाद्वारे उपचार केले जातात. येथे आयव्हीएफसारख्या प्रगत उपचारांसोबतच रुग्णांचा आहार, तणाव व्यवस्थापन आणि जीवनशैली सुधारण्यावरही विशेष भर दिला जातो, अशी माहिती डॉ. मळगांवकर यांनी दिली.

वाढते वय, बदलती जीवनशैली, शरी-रातील सूक्ष्म पोषक घटकांची कमतरता आणि उच्च पातळी-वरील मानसिक तणाव यामुळे जननक्षमतेवर थेट परिणाम होतो. त्यामुळे केवळ वरवरच्या चाचण्यांवर अवलंबून न राहता सखोल निदान करणे आवश्यक आहे.
- डॉ. नरहरी मळगांवकर, वंध्यत्व निवारण तज्ज्ञ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT