Sindhudurg Tourism 2026 | गुलदार नौकेचे दहा तासांचे 'ऑपरेशन निवती'

Sindhudurg Tourism 2026 | रात्री समुद्रात विसावणार; पर्यटन महामंडळाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प
Sindhudurg Tourism 2026
Sindhudurg Tourism 2026pudhari news network
Published on
Updated on

कुडाळ : प्रमोद म्हाडगुत

एक्स आयएनएस गुलदार (EX INS Guldar) या ऐतिहासिक युद्धनौकेला निवतीच्या समुद्रात सुरक्षितपणे तळाशी पोहोचवण्याच्या मोहिमेला सोमवारी सकाळी ११ वाजल्यापासून सुरुवात झाली. समुद्राच्या अथांग गर्भातील २२ मीटर खोलीवर हे महाकाय जहाज स्थिरावण्यासाठी तब्बल १० तासांचा प्रदीर्घ कालावधी लागला.

Sindhudurg Tourism 2026
Medical Miracle | बाळाच्या पोटात अर्भक !

रात्री उशिरा ही विसर्जन प्रक्रिया पूर्ण होऊन युद्धनौका समुद्रतळा खाली विसावणार आहे. या ऐतिहासिक क्षणाची आणि जहाजाच्या स्थितीची अचूक नोंद घेण्यासाठी तज्ज्ञ पथकाने समुद्रतळाशी अत्याधुनिक कॅमेरे सेट केले आहेत. हे संपूर्ण तांत्रिक काम चोखपणे पार पाडून, दुपारीच या मोहिमेतील तज्ज्ञ पथक सुखरूपपणे समुद्राबाहेर आले. या जलसमाधी दिलेल्या नौकेवर कृत्रिम समुद्री प्रवाळ निर्माण करण्यात येणार असून ती पर्यटकांना दाखविण्यासाठी पाणबुडीच्या सहाय्याने समुद्रात पाण्यामध्ये सफर घडविली जाणार आहे.

पर्यटन, संवर्धन आणि इतिहासाचा संगम हा प्रकल्प केवळ पर्यटनापुरता मर्यादित नसून समुद्री पर्यावरण संवर्धन, ऐतिहासिक वारशाचा पुनर्वापर आणि साहसी पर्यटन यांचा सुंदर संगम ठरणार आहे. अंडरवॉटर म्युझियम म्हणजे समुद्राखाली तयार केलेली अशी रचना जी स्कुबा डायव्हर्स आणि पर्यटकांसाठी खुली असते. यात समुद्री जीवसंवर्धन, साहसी पर्यटन, संशोधन आणि जनजागृती यांचा समावेश असतो.

Sindhudurg Tourism 2026
Nashik MLC Election | शिंदे शिवसेना-भाजपत रस्सीखेच

स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना

या प्रकल्पामुळे स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. स्कुबा डायव्हिंग प्रशिक्षण, पर्यटन मार्गदर्शक, बोट सेवा, फोटोग्राफी, हॉटेल व्यवसाय आणि इतर पर्यटनपूरक उद्योगांना चालना मिळणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा जागतिक पर्यटन नकाशावर ठळकपणे झळकण्यास या प्रकल्पाची महत्त्वाची भूमिका ठरणार आहे. समुद्री संवर्धन, साहसी पर्यटन आणि स्थानिक रोजगारनिर्मिती यांचा अनोखा मेळ साधणारा हा प्रकल्प सिंधुदुर्गच्या पर्यटन इतिहासातील नवा मैलाचा दगड ठरणार आहे.

भारताचे नवे डायव्हिंग डेस्टिनेशन

हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सिंधुदुर्ग भारतातील प्रमुख समुद्राखालील डायव्हिंग केंद्र म्हणून विकसित होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. येथे पर्यटकांना स्कुबा डायव्हिंग, पाणबुडी पर्यटन, समुद्राखालील फोटोग्राफी, मार्गदर्शकांसह डायव्हिंग टूर तसेच समुद्र शिक्षण आणि संशोधनाचा अनोखा अनुभव घेता येणार आहे. समुद्राच्या तळाशी विसावलेली युद्धनौका, तिच्याभोवती फिरणारे रंगीबेरंगी समुद्री जीव आणि कृत्रिम प्रवाळांचा विस्तार हा पर्यटकांसाठी रोमांचकारी अनुभव ठरणार आहे.

पर्यावरण सुरक्षेला प्राधान्य

या प्रकल्पासाठी गोवा येथील राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेमार्फत सखोल वैज्ञानिक अभ्यास करण्यात आला आहे. अभ्यासानुसार या परिसरात नैसर्गिक प्रवाळ नसल्याचे स्पष्ट झाले असून, दीर्घकालीन पर्यावरणीय लाभ लक्षात घेऊन हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. जहाजातील सर्व घातक आणि प्रदूषणकारक घटक पूर्णपणे हटवून ते पर्यावरणदृष्ट्या सुरक्षित करण्यात आले आहे. तसेच, जहाजाच्या ५०० मीटर परिसरात मासेमारी आणि अँकर टाकण्यास बंदी प्रस्तावित करण्यात आली असून, समुद्री जैवविविधतेचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जाणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news