Two-hour queue for donation darshan pass at Trimbak
त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा
शनिवारी त्र्यंबकेश्वर मंदिरात - दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर - भाविकांची गर्दी उसळली. दोनशे - रुपयांच्या देणगी दर्शन पासचे - ऑनलाइन बुकिंग शनिवार, रविवार व सोमवार या दिवशी बंद असल्याने, तिकीट विक्री केंद्रावर भाविकांनी भरपावसात रांगा लावल्या होत्या. - तिकीट मिळवण्यासाठी तब्बल दोन तास रांगेत आणि त्यानंतर दर्शनासाठी - पुन्हा दोन तास थांबावे लागले, ज्यामुळे कमालीची गैरसोय - झाल्याच्या तक्रारी भाविकांनी - केल्या.
श्रावण सरींमुळे सर्वत्र चिखल - निर्माण झाला असून, चप्पल काढून - चालताना अनेकांना रस्त्यावरील घाण व दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. दर्शन रांगेत उभ्या असलेल्या भक्तांना सांडपाणी प्रक्रिया = केंद्राजवळून जावे लागत असून, - तेथील अस्वच्छतेमुळे त्रास अधिक - वाढतो आहे. दर्शन झाल्यानंतर -मिळणाऱ्या आध्यात्मिक समाधानावर या अव्यवस्थेने पाणी फेरल्याची भावना भाविकांमध्ये आहे.
मंदिराच्या उत्तर दरवाजासमोरील चौकात होणाऱ्या गर्दीसाठी कोणतीही स्पष्ट सूचना नसल्याने, बाहेरून आलेल्या भाविकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. ध्वनिक्षेपकावरून आगे से राइट जाओ, धर्मदर्शन रांग आगे है असे सांगण्यात येत असले तरी, तिकीट केंद्र आणि दर्शनबारी कोठे आहे हे समजत नाही.
या सर्व गोंधळाबाबत अनेक भाविकांनी नाराजी व्यक्त केली. प्रशासनाकडून माहिती केंद्राची स्थापना करण्यात यावी, अशी मागणी वारंवार होत आहे. तसेच मंदिर परिसरात व कुशावर्ताजवळ असलेली पोलिस चौकी बंद असून, ती पुन्हा सुरू करावी आणि सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस कर्मचारी नेमावेत, अशीही मागणीही जोर धरू लागली आहे.