नाशिक : कावेरी मोरे
मोबाइल आणि लॅपटॉपचा वाढता वापर लक्षात घेता, तरुण आता केवळ डोळ्यांचे संरक्षण नव्हे तर स्टायलिश दिसायलाही प्राधान्य देत आहेत. त्यामुळे शहरात फॅशन आयवेअरचा ट्रेंड झपाट्याने वाढला आहे. ट्रान्सपरंट, कॅटआय, रेट्रो, राउंड आणि मेटल ब्लॅक स्क्वेअर अशा वजनाच्या फ्रेम्सना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. हलक्या ऑप्टिकल दुकानदारांच्या माहितीनुसार, कॉलेज विद्यार्थी आणि कार्यालयीन तरुण वर्गात 'ब्लू लाइट फिल्टर', 'मेटल लूक' आणि 'ट्रान्सपरंट फ्रेम' या प्रकारांच्या चष्म्यांना विशेष लोकप्रियता मिळत आहे. तरुणाईमध्ये डोळ्यांचे आरोग्य जपतानाच स्टाईल राखण्याचा नवा फॅशन ट्रेंड आता दृश्यमान झाला.
चष्मा घेताना या गोष्टी लक्षात घ्या
चष्मा दोन भागांचा बनलेला असतो तो फ्रेम आणि ग्लास. दोन्ही तितकेच महत्त्वाचे असले तरी, ग्लासची गुणवत्ता अधिक निर्णायक असते. कमी किमतीत मिळणारे चष्मे दिसायला आकर्षक असले तरी त्यांची क्वालिटी कमी असल्याने डोळ्यांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे फ्रेमपेक्षा ग्लासच्या गुणवत्तेला प्राधान्य देणे आवश्यक आहे. उच्च दर्जाचा ग्लास वापरल्यास दृष्टी सुरक्षित राहते आणि चष्म्याचे आयुष्यही वाढते.
मुलांमध्ये लोकप्रिय फ्रेम्स
ट्रान्सपरंट किंवा क्लिअर फ्रेम्स, थिन मेटल फ्रेम्स (गोल्डन, सिल्व्हर), मेटल ब्लॅक स्क्वेअर फ्रेम्स, ब्लू लाइट फिल्टर फ्रेम्स आणि लेटर स्टाईल फ्रेम्स या प्रकारांना मुलांकडून मोठी पसंती मिळत आहे.
मुलींचा कल ट्रेंडी फ्रेम्सकडे
कॅटआय, ट्रान्सपरंट पेस्टल (पिंक, लव्हेंडर, बिंग), राउंड मेटल, ओव्हरसाइज आणि रिमलेस फ्रेम्स या प्रकारांचे चष्मे मुलींमध्ये सर्वाधिक लोकप्रिय ठरत आहेत.
मोबाइल आणि लॅपटॉपच्या वाढत्या वापरामुळे डोळ्यांवरील ताण कमी करण्यासाठी ब्लू लाइट फिल्टर चष्मे घेतले जात आहे. ट्रान्सपरंट आणि हलक्या फ्रेम्सला आधुनिक लूकमुळे तरुणांचा विशेष प्रतिसाद मिळत आहे.श्री पाटील, लेन्स गॅलरी आय केअर, ऑप्टोमेट्रिस्ट
चष्मा वापरल्याने पर्सनॅलिटी अधिक स्मार्ट दिसते त्याचबरोबर डोळ्यांचीही काळजी घेतली जाते.- कामना यशवंते, तरुणी