मुख्यमंत्री निवडणूक प्रचाराचे आज रणशिंग फुंकणार

मुख्यमंत्री निवडणूक प्रचाराचे आज रणशिंग फुंकणार
Maharashtra Election
मुख्यमंत्री निवडणूक प्रचाराचे आज रणशिंग फुंकणारFile Phot
Published on
Updated on

Nashik Chief Minister to start election campaign today

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यासह डझनभर मंत्र्यांच्यासह , उपस्थितीत गुरुवारी (दि. १३) महत्त्वाकांक्षी रामकाल पथासह ५,६५७ कोटींच्या सिंहस्थ कामांचे भूमिपूजन तसेच जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन होत आहे. या निमित्ताने त्र्यंबक रोडवरील महाराष्ट्र पोलिस अकादमीसमोरील ठक्कर ग्राउंड येथे दुपारी १ वाजता मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा होणार आहे. सभेच्या माध्यमातून ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या प्रचाराचे रणशिंग फुंकणार असल्याचे वृत्त आहे.

Maharashtra Election
Municipal Council elections : सिन्नर नगर परिषद निवडणुकीत भाजप-शिवसेना युती

नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे २०२६ २७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. कुंभमेळ्याच्या तयारीला वेग आला आहे. सिंहस्थासाठी कमी कालावधी राहिला असला तरी मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत वेळेत कामे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेली कामे जानेवारी २०२७पर्यंत पूर्ण होतील, असा दावा आयुक्त मनीषा खत्री यांनी केला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे रस्त्यांची कामे सुरू झाली आहेत. त्र्यंबकेश्वर नगरपालिका कुंभमेळ्याशी व संबंधित नगरपालिकांच्या क्षेत्रातही कामे सुरू झाली आहेत. भीमाशंकर, शिर्डी, शनिशिंगणापूर येथेही कुंभमेळा आराखडे मंजूर आहेत. ओझर विमानतळावर धावपट्टीचे काम सुरू झाले आहे. नाशिकमध्ये कामांना गती मिळत नव्हती. प्रशासकीय पातळीवर तयारी पूर्ण झाल्याने आता त्या कामांचे एकत्रित प्रेझेंटेशन व भूमिपूजनाचा कार्यक्रम गुरुवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत होत आहे. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांबरोबरच कुंभमेळामंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, क्रीडामंत्री अॅड. माणिकराव कोकाटे, अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ, उद्योगमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, पणनमंत्री जयकुमार रावल यांच्यासह डझनभर मंत्री उपस्थित राहतील.

Maharashtra Election
Municipal Council Election : सलग तिसऱ्या दिवशीही अर्जाचा आकडा शून्य

अंतर्गत रिंगरोड विकसित

लेखानगर - वडाळा रविशंकर मार्ग विजय ममता चौक -३८.४९ कोटी

पपया नर्सरी ते एक्स-लो जंक्शन ७७.३२ कोटी

गंगापूर रोड - जेहान सर्कल गंगापूर गाव ४९.३४ कोटी

संगम स्विट- मिरची हॉटेल अमृतधाम तारवालानगर-मखमलाबाद रोड - ८३.२६ कोटी

बारदान फाटा ते सुला चौक रस्ता -५६.८५ कोटी

नांदूरपूल ते जत्रा हॉटेल - ७१.०२ कोटी

अशोक स्तंभ ते जेहान सर्कल ३७.८१ कोटी

वडनेर गेट- विहितगाव ३१.९९ कोटी

जुना गंगापूर नाका - शरणपूर पोलिस चौकी मायको सर्कल- चांडक

सर्कल ४८.०८ कोटी

या कामांचे होणार भूमिपूजन

तपोवन मलनिःसारण केंद्र येथे पूल बांधणे ३५.४५ कोटी

लक्ष्मीनारायण मंदिराजवळ समांतर पूल बांधणे २०.६९ कोटी

संत गाडगे महाराज पुलाखाली डाउन रॅम्प ५.८५ कोटी

मिलिंदनगर येथे पूल बांधणे १७.२२ कोटी

वडनेर दुमाला येथे वालदेवी नदीवर पूल बांधणे १५.६६ कोटी

रामकाल पथ योजनेंतर्गत मंदिर नूतनीकरण व जीर्णोद्धार -२२.५५ कोटी

रामकाल पथ टप्पा क्र. २ विकसित करणे ८३.३५ कोटी

रामकाल पथ योजनेंतर्गत प्रकल्प बाधितांसाठी घरकूल योजना -१४.९८ कोटी

वाघाडी नदीलगत भाजीबाजाराजवळ संरक्षक भिंत ७.२० कोटी

मुकणे धरण थेट पाणीपुरवठा योजना व जलवाहिनी- ३७१.७५ कोटी

अमृत-२ योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजना ३०५.१२ कोटी

साधुग्राम पाणीपुरवठ्यासाठी २ लाख लिटरचे दोन जलकुंभ -७.१३ कोटी

पीपीपी हॅम मॉडल अंतर्गत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प-१४७५.५० कोटी

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत सीसीटीव्ही ३५२.८५ कोटी

ऑप्टिकल फायबर केबल ८३.७१ कोटी

आडगाव येथे इलेक्ट्रिक बस डेपो उभारणी २७.४७ कोटी

बिटको रुग्णालयात नवजात शिशु

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news