नाशिक : नाशिकमधील टीसीएस कंपनीत महिला कर्मचाऱ्यांवरील लैंगिक अत्याचार व जबरदस्तीने धर्मांतराच्या कथित प्रकरणात तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतशी गंभीर आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. पीडित महिलांच्या जबाबातून आरोपींकडून मानसिक, शारीरिक तसेच धार्मिक छळ केल्याचे प्रकार उघड झाले आहेत. 'तुझी फिगर झीरो आहे, गरज पडल्यास बोलव,' अशा अश्लील टिप्पणी केल्याचे पीडितेने सांगितले असून, कार्यालयात महिलांना सतत त्रास दिला जात असल्याचे जबाबात सांगितले आहे.
पीडितेच्या म्हणण्यानुसार, गुढीपाडव्याच्या दिवशी आरोपी रजा मेनन याने तिच्या साडीचा पदर ओढल्याची घटना घडली. तसेच आसिफ अन्सारी वारंवार तिच्या जवळ येऊन बसणे, स्पर्श करणे आणि घाणेरड्या टिप्पणी करणे, असे प्रकार सुरू होते. 'तू प्लेअर आहेस' अशा शब्दांत चिडवणे, तसेच धार्मिक भावना दुखावतील असे प्रश्न विचारणे, यामुळे महिला कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
तपासादरम्यान आरोपींच्या मोबाइलमधून व्हॉट्सअॅप ग्रुपबाबतही धक्कादायक माहिती समोर आली आहे. या ग्रुपमध्ये महिलांविरोधात आक्षेपार्ह संदेश पाठवले जात असल्याचे समोर आले असून, इंटरनेट पासवर्डही अश्लील किंवा भावना दुखावतील अशा पद्धतीने ठेवले जात होते. काही आरोपींनी डेटा डिलीट केल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे.
पुन्हा तपास...
टीसीएसमधील अत्याचार प्रकरणात आठ जणांविर-ोधात गुन्हा दाखल असून, सात जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र, मुख्य सूत्रधार मानली जाणारी निदा खान अद्याप फरार आहे. तिचा शोध घेण्यासाठी पोलिसांची तीन पथके कार्यरत आहेत. आरोपींना पुन्हा पोलिस कोठडीत घेऊन अधिक तपास केला जाणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.