नाशिक : शिर्डी येथील चार एकर भूखंड बळकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर भोंदू अशोक खरात याची पत्नी कल्पना खरात फरार झाल्याने पोलिसांनी शोधमोहीम अधिक तीव्र केली आहे. मात्र, भोंदू खरातच्या ‘तृप्ताबाला’ बंगल्यावर छापा टाकून मुलगा हर्षवर्धन खरात यास तपास पथकाने मंगळवारी ताब्यात घेतले.
सावकारी अधिनियमांतर्गत कल्पना खरात हिच्यासह पाचजणांविरुद्ध शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रामदास गोंदकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आर्थिक व्यवहाराच्या माध्यमातून संबंधित भूखंडावर बेकायदेशीर ताबा मिळविल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणातील दोन आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असून, त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.