TCS Nashik case Nida Khan pudhari photo
नाशिक

TCS Nashik case Nida Khan - निदा खानला न्यायालयीन कोठडी

TCS Nashik Case - निदा खानला न्यायालयीन कोठडी

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : आयटी कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि कथित धर्मांतरण प्रकरणातील संशयित निदा खान हिला न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. चार दिवसांची पोलिस कोठडी संपल्यानंतर सोमवारी (दि.११) तिला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश केदार जोशी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीनंतर न्यायालयाने तिला न्यायालयीन कोठडी देत नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात रवानगीचे आदेश दिले.

निदा खान गर्भवती असल्याने न्यायालय परिसरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तिच्यावर असलेल्या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर सरकारी पक्ष आणि बचाव पक्षामध्ये जोरदार युक्तिवाद झाला. सरकारच्या वतीने विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी बाजू मांडली, तर निदा खानच्या वतीने अॅड. राहुल कासलीवाल यांनी काम पाहिले.

पोलिस कोठडीदरम्यान तपास पथकाने निदा खानची तिच्या कुटुंबीयांसमोर समोरासमोर बसवून चौकशी केली होती. फरार असताना तिला कोणी आश्रय दिला, तसेच कथित धर्मातरण प्रकरणातील इतर धागेदोरे कुठे जोडलेले आहेत, याबाबत पोलिसांनी सखोल तपास केल्याची माहिती समोर आली आहे. चौकशीदरम्यान काही महत्त्वाचे दवे हाती लागल्याचेही समजते.

निदा खान गर्भवती असल्यामुळे तिच्या आरोग्याची आणि सुरक्षेची विशेष काळजी घेण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. न्यायालयाने पोलिस कोठडी वाढवून न दिल्याने तिची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. तथापि, या प्रकरणातील इतर गुन्ह्यांचा तपास आणि पुढील चौकशीसाठी पोलिसांकडून पुन्हा तिचा ताबा मागितला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT