Death Pudhari
नाशिक

Crime News | सावकारी कर्जाचा तगाडा; सिन्नरमधील तरुणाच्या आत्महत्याप्रकरणी सात जणांना बेड्या

Crime News | घरात घुसून शिवीगाळ, दमदाटीचा प्रकार; आठव्या संशयिताचा शोध सुरू

पुढारी वृत्तसेवा

सिन्नर (पुढारी वृत्तसेवा):

सिन्नर शहरातील अतुल रामदास बोन्हाडे या तरुणाने सावकारी कर्जाच्या तगाड्याला कंटाळून केलेल्या आत्महत्याप्रकरणी त्यांच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून सिन्नर पोलिसांनी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात अवैध सावकारीच्या अनुषंगाने महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम प्रतिबंधक तरतुदींचाही समावेश करण्यात आला आहे.

पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत सात संशयितांना अटक केली असून, एक महिला संशयित फरार आहे. सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्याकडून ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणात सचिन संभाजी गिते (४५, रा. काणडी मळा, सिन्नर), हर्षल मिलिंद गोळेसर (२४, रा. खळवाडी, सिन्नर),

सौरभ मनोज खेडलेकर (३३, रा. सिन्नर), सचिन बाबूराव धनगर (३६, रा. वैदुवाडी, सिन्नर), मीरा अनिल खोपे (६२, रा. विरय नगर, सिन्नर), माधुरी सागर शिंदे (२८, रा. नायगाव रोड, सिन्नर) आणि उज्ज्वला रवींद्र लोखंडे (५५, रा. नाशिक वेस, सिन्नर) या सात जणांना अटक करण्यात आली आहे. तर आठवा संशयित अद्याप फरार असून, त्याचा शोध सुरू आहे.

कर्जाची परतफेड, तरीही वसुलीचा तगाडा

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतुल बोन्हाडे यांनी संशयित आरोपींकडून वेळोवेळी पैसे घेतले होते. घेतलेल्या रकमेची परतफेडही त्यांनी केली होती. मात्र, आरोपींनी केवळ व्याजाची रक्कम मिळाली असून मुद्दल अजून बाकी असल्याचे सांगत त्यांच्याकडे पैशांचा तगाडा लावला. प्रत्यक्ष भेटून, फोनद्वारे, मेसेज करून तसेच घरी जाऊन शिवीगाळ व दमदाटी करण्यात येत होती. या सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून अतुल यांनी आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

सावकारीच्या मुद्द्याने प्रकरणाला गंभीर वळण

अतुल बोन्हाडे यांच्या आत्महत्याप्रकरणी सावकारी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल झाल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. दरम्यान, फरार संशयितांचा शोध आणि या प्रकरणातील पुढील तपासाकडे आता सिन्नरकरांचे लक्ष लागून आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT