नाशिक : सिंहस्थ प्राधिकरण अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या सूचनेनुसार कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून सिंहस्थ काळातील वाहतूक नियोजनासाठी पोलिस आयुक्तांनी सिंहस्थ कामांतर्गत प्रस्तावित ६१ रस्त्यांची वर्गवारी अ, ब, क अशा तीन गटांत करत प्राधान्यक्रम निश्चित केला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात अत्यावश्यक २३ रस्त्यांचे रुंदीकरण, अस्तरीकरण केले जाणार आहे. ब वर्गात २५, तर क वर्गात ९ रस्त्यांचा समावेश करण्यात आला आहे. पंचवटीतील शाही मार्गाचा ब वर्गात समावेश करण्यात आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
येथे २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. सिंहस्थकामांसाठी महापालिकेने १५ हजार कोटींचा आराखडा सादर केला आहे. सिंहस्थासाठी शासनाने स्वतंत्र कुंभमेळा प्राधिकरण स्थापन केले आहे. या प्राधिकरणाला एक हजार कोटींचा निधीही मंजूर केला आहे. त्याचे नियोजन डॉ. गेडाम यांच्यामार्फत सुरू आहे. सिंहस्थांतर्गत, अंतर्गत, मध्य आणि बाह्य अशा तिन्ही रिंगरोडचा विकास केला जाणार आहे.
सिंहस्थातील रस्ते विकासासाठी महापालिकेच्या बांधकाम विभागाने चार हजार कोटी रुपयांचा आराखडा तयार केला होता. त्याला कात्री लावत डॉ. गेडाम यांनी आवश्यक रस्त्यांचीच यादी सादर करण्याचे निर्देश महापालिकेला दिले होते. त्यानुसार आता बांधकाम विभागाने शहरातील ६१ रस्ते आणि त्यासाठी येणाऱ्या २,०६८ कोटींच्या खर्चाची यादी सादर केली होती. या रस्त्यांचा प्राधान्यक्रम निश्चित करून देण्याची जबाबदारी डॉ. गेडाम यांनी पोलिस आयुक्तांवर सोपविली होती. त्यानंतर महापालिका आयुक्त मनीषा खत्री आणि पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी एकत्रित बैठक घेत चर्चा केली होती. त्यानंतर पोलिस आयुक्तांनी रस्त्यांचे प्राधान्यक्रम असलेली यादी महापालिकेकडे सुपूर्द केली आहे.
पोलिस आयुक्तांनी अ वर्गवारीत २३ रस्ते, ब वर्गवारीत २९ आणि क वर्गवारीत ९ रस्त्यांचा समावेश केला आहे. अ वर्गवारीत अत्यंत महत्त्वाच्या रस्त्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात पंचवटीसह, नाशिकरोड आणि नाशिक पूर्व विभागातील रस्त्यांचा समावेश आहे. सिंहस्थ निधी मिळाल्यानंतर या रस्त्यांची कामे सुरू होणार आहेत.
पोलिस आयुक्तांनी तयार केलेल्या यादीत तपोवन आणि रामकुंडाजवळी महत्त्वाचे रस्ते दुसऱ्या अर्थात ब वर्गवारीत टाकले आहेत. यात पंचवटीतील कपिला संगम- लक्ष्मी नारायण मंदिर- आग्रा रोड- पंचमुखी हनुमान मंदिर- काट्या मारुती- गणेशवाडी देवी मंदिर- गाडगे महाराज पूल- टाळकुटेश्वर मंदिर पूल या शाही मार्गावरील रस्त्यासह, कपिला संगम- जय शंकर फेस्टिव्हल लॉन्स- नांदूर दसक शिव रोड, तपोवन लक्ष्मी नारायण मंदिर पंचवटी अमरधाम गाडगेमहाराज पूल हे रस्तेही दुसऱ्या टप्प्यात घेतले जाणार आहेत.
१- सौभाग्य नगर ते बिटको चौक
२- पंचवटी विभागातील नांदूर पूल ते नांदूर नाका ते जत्रा हॉटेल ते म्हसरूळ आडगाव लिंक रोड.
३- पिपंळगाव खांब- वडनेर गाव- वडनेर गेट- वीर सावरकर चौक- बागूलनगर- विहितगाव
४- गंगापूर रोड- जेहान सर्कल- गंगापूर गाव
५- गंगापूर रोड बारदान फाटा- सुला चौक.
६- पंचवटी विभागातील आडगाव राष्ट्रीय महामार्ग क्र. ३ म्हसरूळ गाव.
७- पंचवटी म्हसरूळ गाव- मनपा हा वरवंडी रस्ता (विमानतळाकडे जाणारा रस्ता)
८- दत्त मंदिर सिग्नल- पुनारोड- बिटको चौक- छत्रपती शिवाजी महाराज पुतळा- डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (सुभाष रोड)- सत्कार पॉइंट.
९ - चोपडा लॉन्स ड्रीम कॅसल- मखमलाबाद गाव
१०- पंचवटी विभागातील शिंदे मळा मार्केट सिग्नल- गुंजाळबाबा चौक- तारवाला चौक- अमृतधाम चौक-मिरची हॉटेल चौक- संगम पूल.
११- टाकळी फाटा एनएच- ३- टाकळी गाव- गांधीनगर- उपनगर- एनएच- ६०.
१२- पाथर्डी फाटा- पाथर्डी गाव- पिंपळगाव खांब शिव.
१३- सिटी सेंटर मॉल- इंदिरानगर अंडरपास.
१४- अंबड गाव- एक्स्लो चौक टेक्समो फोर्स सोल्युशन कंपनी अंबड गाव पाथर्डी फाटा.
१५- नवीन नाशिक विभागातील बाह्य रस्ता वळण चौक एक्स्लो चौक.
१६- रामकुंड- सार्वजनिक वाचनालय- पंचवटी कारंजा- निमाणी चौक- पुरिया पार्क- आर. पी. विद्यालय- निमाणी बसस्टॅण्ड- काटया मारुती चौक संतोष टी पॉइंट आग्रा रोड
१७- आठवण मंगल कार्यालय चव्हाण मळा स्वामी नारायण शाळा- मुंबई- आग्रा रोड पावेतो.
१८- काट्या मारुती चौक हत्ती पूल श्री काळाराम मंदिर पावेतो.
१९- जनार्दन स्वामी मठ- लक्ष्मी नारायण पूल पावेतो.
२०- घाटगे मळा- मखमलाबाद रोड- आरटीओ कार्यालय- पेठ रोड- राज स्वीट्स- दिंडोरी रोड- रासबिहारी शाळा- मुंबई आग्रा रोड निलगिरी बाग- टाकळी एसटीपी पूल पावेतो.
२१- निमाणी चौक- मनपा हव दिंडोरी रोड पावेतो.
२२- पेठ रोड कालवा- तवली फाटा- आळंदी कालव्यापर्यंत
२३- दत्त मंदिर सिग्नल- पुनारोड- बिटको चौक- छत्रपती शिवाजी महाराज पुतळा- डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक- सुभाष रोड- सत्कार पॉइंट