Shardiya Navratri Utsav 2026 
नाशिक

Saptashrunggad Navratrotsav 2026 | श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावर शारदीय नवरात्रोत्सवाला दिमाखदार आणि उत्साहात प्रारंभ

Saptashrunggad Navratrotsav 2026 | देवी आभूषणांची पारंपरिक मिरवणूक ; पहिल्याच माळेला हजारो भाविकांची मांडियाळी

पुढारी वृत्तसेवा

सप्तशृंगगड : पुढारी वृत्तसेवा
आद्यस्वयंभू शक्तिपीठ श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावर आई सप्तशृंगीमातेच्या शारदीय नवरात्रोत्सवाला रविवार (दि. ११) उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेला हजारो भाविकांनी गडावर गर्दी करीत देवीचे दर्शन घेतले. घटस्थापनेला रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे भाविकांच्या गर्दीने सप्तशृंगगड गजबजला होता.

गडावर ज्योत घेऊन येणाऱ्या हजारो भाविकांमुळे संपूर्ण तीर्थक्षेत्र परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. पहिल्या माळेला धार्मिक विधींना पारंपरिक पद्धतीने सुरुवात करण्यात आली. सकाळी ७ वाजता विश्वस्त तथा धर्मदाय सह आयुक्त विवेक सोनुने यांनी सपतीक देवीच्या पारंपरिक आभूषणांचे विधिवत पूजन केले. यावेळी पुरोहितांना दक्षिणा देऊन विश्वस्त संस्थेच्या मुख्य कार्यालयातून देवीच्या सर्व आभूषणांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. संपूर्ण मार्गावर रंगोली आणि फुलांची सजावट करण्यात आली होती. देवीनामाच्या घोषणाने वातावरण चैतन्य निर्माण झाले होते.
दरम्यान, राज्याचे मुख्य धर्मदाय आयुक्त अमोग कलती, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, नाशिक राहुल रोकडे यांनी भगवतीच्या पहिल्या माळेची सपत्नीक महापूजा केली. विधिवत मंत्रोच्चार आणि धार्मिक विधींच्या साक्षिने महापूजा झाली. महापूजेनंतर श्री भगवती मंदिरात घटस्थापना करण्यात आली.

यावेळी तहसीलदार रोहिदास वारुळे, पोलिस निरीक्षक प्रदीप देशमुख, उपजिल्हाधिकारी बंडू कापसे, देवी ट्रस्टचे मुख्य व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, नाशिक धर्मदाय कार्यालयाचे अधीक्षक विशाल जाधव, निरीक्षक हरिहर गाडगे, निरीक्षक अत्तरदे, विशाल सपकाळ, जिल्हा न्यायालय राजशिष्टाचार अधिकारी कातिलाल परदेशी, कैलास डोंगरे, प्रकाश पगार,

सरपंच रमेश पवार, उपसरपंच संदीप बेणके, राजेश गवळी, जनसंपर्क अधिकारी मिकन वाबळे, नारद अहिरे, विश्वनाथ बर्डे, सुनील कासार, प्रशांत निकम, यशवंत देशमुख, रणजीत उगले, श्याम पवार, सागर निश्चित, राज जोशी, किरण राजपूत, संतोष चव्हाण, मच्छिंद्र बर्डे आदी उपस्थित होते.

धार्मिक विधी अन् भाविकांचा उत्साह:

नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी गडावर भाविकांच्या गर्दीचा ओघ दिसून आला. मंदिर परिसरातील भक्तिमय वातावरण आणि धार्मिक विधीचा उत्साह यामुळे गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची दिमाखदार सुरुवात झाली. आगामी दिवसांतही आई भगवतीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्यामुळे मंदिर ट्रस्ट आणि प्रशासनाकडून चोख नियोजन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT