Nashik Drought Declaration | नाशिक जिल्ह्यात दुष्काळ जाहीर; मात्र पंचनाम्यांच्या धीमी गतीमुळे शेतकऱ्यांची मदत रखडली

Nashik Drought Declaration | पंचनामे ८४ टक्क्यांवर, प्रत्यक्ष ३४ टक्केच काम पूर्ण
Drought
DroughtPudhari
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

खरीप हंगाम २०२६ मध्ये ट्रिगर-१ लागू झालेल्या नाशिक जिल्ह्यातील १० तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर झाली असली, तरी शेतकऱ्यांना मदत मिळण्यापूर्वी पंचनाम्यांचा अडथळा दूर होणे आवश्यक आहे. कृषी विभागाच्या ८ ऑक्टोबरच्या अहवालानुसार, जिल्ह्यात ८४.५४ टक्के गावांतले पंचनामे पूर्ण झाले असले, तरी प्रत्यक्ष क्षेत्रफळाच्या केवळ ३४.६० टक्के, खातेदारांचे ४५.२३ टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत.

Drought
Divyang School Recruitment Scam| नाशिक, धुळे अन् जळगावात दिव्यांग शाळांमध्ये बोगस शिक्षक भरतीचा महाघोटाळा उघडकीस!

त्यामुळे गावांच्या पंचनाम्यांची प्रगती आणि प्रत्यक्ष शेतांवरील कामात मोठी तफावत दिसून येत आहे. जिल्ह्यातील १,३३९ गावांतील ५ लाख ९२ हजार हेक्टर क्षेत्रावरील ५ लाख ६० हजार खातेदार बाधित आहेत. मात्र, पंचनाम्यांची प्रक्रिया संथ असल्यामुळे पीकविमा आणि दुष्काळ मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

जिल्ह्यात तालुकानिहाय आकडेवारीत मोठी तफावत समोर आली आहे. बागलाणमध्ये १७२ गावांपैकी ९५.९३ टक्के गावांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. प्रत्यक्ष क्षेत्राचे केवळ ९.४२ टक्के पंचनामे झाले आहेत. इगतपुरीतील १२६ गावांचे पंचनामे पूर्ण असूनही क्षेत्राचे प्रमाण २१.८५ टक्के आहे.

दुसरीकडे, मालेगावमध्ये १५१ पैकी केवळ ४५.६७ टक्के गावांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. ७६ गावे प्रलंबित आहेत. येवल्यात १२४ पैकी ४८.३९ टक्के गावांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. कळवणमध्ये ८१.५८ टक्के गावांचे आणि ५५.६६ टक्के क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.

सुरगाण्यात गावांच्या पंचनाम्यांचे प्रमाण ९४.७६ टक्के आहे. दरम्यान, गुरुवारि (दि. ८) जिल्ह्यात ३०५ गावात ६५ हजार १०२ हेक्टर क्षेत्रावरील ७१ हजार ३७७ खातेदारांचे पंचनामे करण्यात आले आहेत. मात्र, प्रलंबित पंचनामे कधी पूर्ण होणार आणि शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार, हा प्रश्न कायम आहे.

Drought
Dwarka Datta Mandir Road | द्वारका ते दत्तमंदिर रस्ता रुंदीकरणाचा मार्ग अखेर मोकळा; नाशिक महापालिकेची 84 कोटींची मोठी बचत

मनुष्यबळाअभावी होतोय विलंब:

एका तलाठ्याकडे तीन ते चार गावांचा कारभार, महसूल सहायकांची रिक्त पदं आणि विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींची अनुपलब्धता यामुळे पंचनाम्यांना विलंब होत असल्याचे क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. कृषी सहायक, तलाठी आणि विमा प्रतिनिधीच्या संयुक्त उपस्थितीची आवश्यकता असल्याने समन्वयाचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यातच पंचनामे अपलोड करण्यासाठीच्या ॲपमधील तांत्रिक अडचणींमुळे कामाचा वेग मंदावलेला असल्याचे बोलले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news