Shardiya Navratri Utsav 2026 
नाशिक

Shardiya Navratri Utsav 2026 | श्री क्षेत्र सप्तशृंगगडावर शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून चैतन्यमय प्रारंभ; आईच्या जयघोषाने परिसर दुमदुमला

Shardiya Navratri Utsav 2026 | सप्तशृंगगडावर १९ ऑक्टोबरला पालखी मिरवणूक; शतचंदी याग अन् मध्यरात्री शिखरावर फडकणार कीर्तिध्वज

पुढारी वृत्तसेवा

सप्तशृंगगड : पुढारी वृत्तसेवा
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगगडावर रविवार (दि. ११) पासून शारदीय नवरात्रोत्सवाचा भक्तिमय प्रारंभ होत आहे. पहिल्या माळेच्या घटस्थापनेने आई सप्तशृंगीच्या जागाराला सुरुवात होणार असून, पुढील नऊ दिवस गडावर 'आई सप्तशृंगीमाता की जय !' आणि 'जय माता दी!' च्या घोषाने परिसर दुमदुमणार आहे. देवीच्या दर्शनासाठी राज्यातील विविध भागातून तसेच संपूर्ण देशभरातून भाविक गडावर दाखल होण्यास सुरुवात होत आहे.

सह्याद्रीच्या पर्वतगांमध्ये विराजमान आदिमाया सप्तशृंगीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. नवरात्रोत्सव हा केवळ धार्मिक सोहळा नसून, लाखो भाविकांच्या श्रद्धेचा, परंपरेचा आणि भक्तीभावاياचा जागर आहे. घटस्थापनेपासून सुरू होणाऱ्या या उत्सवात देवीची नित्य पूजा, पंचामृत महापूजा आणि विविध धार्मिक विधी पार पडणार आहेत.

नवरात्रोत्सवातील प्रमुख धार्मिक सोहळा सोमवारी (दि. १२) होणार आहे. दुपारी २ वाजता श्री भगवती पालखीपूजन व नगरप्रदक्षीणा, तर दुपारी ३.३० वाजता श्री भगवती कीर्ती ध्वजपूजा व मिरवणूक निघेल. सायंकाली ५ ला शतचंदी याग व होमभवन पूजा होऊन, मध्यरात्री १२ वाजता श्री भगवतीच्या शिखरावर ध्वजारोहणाचा धार्मिक सोहळा होईल.

धार्मिक विधींना प्रारंभ:
नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी रविवार (दि. ११) सकाळी ७ वाजता श्री भगवतीची पंचामृत महापूजा, सकाळी ९.३० वाजता घटस्थापना होईल. त्यानंतर नवरात्रोत्सवात दररोज सकाळी ७ वाजता श्री भगवतीची पंचामृत महापूजा दैनंदिन स्वरूपात होईल. देवीच्या दर्शनासह धार्मिक विधींमध्ये सहभागी होण्यासाठी भाविक उत्सुक आहेत.

कोजागिरी पौर्णिमेचा उत्सव:
श्री सप्तशृंग देवीची अश्विन नवरात्र यात्रा रविवार (दि. ११) ते मंगळवार (दि. २०) या कालावधीत होणार आहे. त्यानंतर दि. २५ ते २६ ऑक्टोबरदरम्यान कोजागिरी पौर्णिमा उत्सव साजरा होईल. नवरात्रोत्सवानिमित्त गडावर भक्ती, शक्ती आणि श्रद्धेचा संगम अनुभवायला मिळणार असून, आई भगवतीच्या जयघोषात गडावर नवरात्राचा जागर होणार आहे.

जोतधारकांची श्रद्धा...:
नवरात्रोत्सवाच्या सुमारे आठ दिवस आधीपासूनच श्री क्षेत्र सप्तशृंगगडावर भक्तीचा अनोखा जागर अनुभवायला मिलता. राज्यातील विविध भागांतून, शहरातून, गावागावांमधून आणि तालुक्यांतून असंख्य देवीभक्त श्री भगवतीच्या चरणी नतमस्तक होऊन पवित्र ज्योत घेऊन आपल्या गावाकडे प्रस्थान करतात. श्रद्धा, भक्ती आणि अढळ विश्वासाच्या बळावर मैलोन्मैल प्रवास करणाऱ्या या जोतधारकांचा सोहळा नवरात्रोत्सवाच्या उत्साहात विशेष भर घालतो. या प्रवासादरम्यान विविध मंडळे आणि सेवाभावी कार्यकर्ते जोतधारकांना पाणी, अल्पोपहार तसेच आवश्यक मदत उपलब्ध करून देत भक्तीसेवेचा आदर्श घालून देतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT