Shalarth ID Scam Pudhari News Network
नाशिक

Shalarth ID Scam | शालार्थ आयडी घोटाळा: चारही संशयितांची जामीन सुनावणी लांबणीवर; न्यायालयाचा मोठा निर्णय

Shalarth ID Scam | नाशिक शालार्थ आयडी प्रकरण: सरकारी पक्षाचा जामिनाला तीव्र विरोध, तपासावर परिणामाची भीती

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात अटकेत असलेल्या चार संशयितांच्या जामीन अर्जांवरील सुनावणी सोमवारी (दि. २८) झाली. यावेळी सरकारी पक्षाने बाजू मांडत हा प्रकार संघटित पद्धतीने केल्याचा दावा करत शासनाची आर्थिक फसवणूक झाल्याने जामिनास विरोध केला. त्यामुळे चारही आरोपींच्या जामीन अर्जांवरील निर्णय लांबणीवर पडला आहे.

तत्कालीन शिक्षणाधिकारी देविदास महाजन यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी (दि. २९) सुनावणी होणार आहे. संस्थाचालक शरद शिंदे यांच्या जामीन अर्जावर यापूर्वी निश्चित झालेल्या तारखेत बदल करण्यात आला असून, आता बुधवारी (दि. ३०) सुनावणी होणार आहे.

तत्कालीन शिक्षणाधिकारी शंतनू हिंगोणीकर यांच्या जामीन अर्जावर ८ ऑक्टोबरला सुनावणी निश्चित करण्यात आली आहे. तर तत्कालीन शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांच्या जामीन अर्जावर २६ ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून, आरोपींना जामीन मिळाल्यास तपासावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचेही सरकारी पक्षाने नमूद केले. दरम्यान, पुढील सुनावण्यांकडे आरोपींसह शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे. चारही संशयितांच्या जामीन अर्जावर न्यायालय काय निर्णय देते, याची उत्सुकता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT