Nashik Municipal Corporation 
नाशिक

Nashik Municipal Corporation | शहरातील वाहतूक कोंडी आणि अपघात रोखण्यासाठी प्रमुख जंक्शनचा होणार शास्त्रीय विकास

Nashik Municipal Corporation | वाहतूक कोंडी, अपघात रोखण्यासाठी जंक्शन सुधार आराखडा

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करून प्रवास अधिक सुरक्षित आणि सुरळीत करण्यासाठी नाशिक महापालिकेने प्रमुख जंक्शनच्या सुधारण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे. यासाठी जंक्शन सुधार आराखडा तयार करण्यात येणार असून, तांत्रिक सल्लागार संस्था नियुक्त करण्याची प्रक्रिया पुढे सरकली आहे.

भारतीय रस्ते काँग्रेसच्या (आयआरसी) मानकांनुसार जंक्शनचे नियोजन व विकास करण्यावर भर देण्यात येणार आहे. शहरातील वाढती वाहनसंख्या आणि अपूर्ण जंक्शन रचनेमुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होत असून, नागरिकांच्या प्रवासाचा वेळही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर प्रमुख जंक्शनचा शास्त्रीय पद्धतीने विकास करण्याचे नियोजन मनपाने केले आहे.

यामुळे वाहतुकीचा प्रवाह सुधारण्यासोबत अपघातप्रवण ठिकाणांवरील धोके कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. नियुक्त करण्यात येणारी सल्लागार संस्था प्रत्येक जंक्शनची प्रत्यक्ष पाहणी करेल. तसेच वाहतूक सर्वेक्षण, उपलब्ध माहितीचे विश्लेषण आणि पुढील दहा वर्षाील वाहतूक व वाहनसंख्येचा अंदाज घेऊन सुधार आराखडा तयार करेल.

या प्रक्रियेत रस्ता सुरक्षा लेखापरीक्षणाचा समावेश असेल. भविष्यातील वाहतुकीचा विचार करून तयार करण्यात आलेल्या ट्रॅफिक मॅप्सचे मायक्रो-सिम्युलेशनही केले जाणार आहे. या उपक्रमामुळे शहरातील प्रमुख जंक्शनची रचना अधिक शास्त्रीय आणि सुरक्षित करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. मात्र, प्रत्यक्ष कामांची अंमलबजावणी,

प्रत्यक्ष चाचणीनंतर अंतिम आराखडा

जंक्शन सुधारणांचा अंतिम आराखडा निश्चित करण्यापूर्वी आवश्यकतानुसार बॅरिकेट्स आणि तात्पुरत्या रस्ते चिन्हांकनाच्या माध्यमातून प्रत्यक्ष चाचणी घेतली जाईल. या कामासाठी शहर वाहतूक पोलिस आणि मनपा अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्यात येणार आहे. सुधारणा पूर्ण झाल्यानंतर तीन महिन्यांनी वाहतुकीचे पुनर्मूल्यांकन करून त्याचा अहवाल सादर केला जाणार आहे.

पाचचारी, सायकलस्वारांच्या सुरक्षेला प्राधान्य

जंक्शनच्या विकासात केवळ वाहनांची वाहतूक सुरळीत करण्यापुरते मर्यादित न राहता पादचारी आणि सायकलस्वारांच्या सुरक्षेलाही महत्त्व दिले जाणार आहे. पदपथ, सायकल मार्ग, पादचारी क्रॉसओवर, रिफ्युज आयलंड, योग्य पथदिवे आणि पावसाळी पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था यांचा आराखड्यात समावेश असेल. तसेच सिग्नल यंत्रणा, बसथांबे, पार्किंग व्यवस्था आणि सीसीटीव्ही, सेन्सर्स व काऊंटडाउन टायमर यांसारख्या स्मार्ट तंत्रज्ञानाचाही विचार केला जाणार आहे.

अडॅप्टिव्ह सिग्नल प्रणाली

वाहनांचे प्रकार आणि शहरातील वाहतुकीची घनता लक्षात घेऊन जंक्शनचा डिझाइन वेग निश्चित केला जाईल. वाहतुकीला योग्य दिशा देण्यासाठी दुभाजक, ट्रॅफिक आयलंड आणि चॅनेलायझेशनचा वापर करण्याचे नियोजन आहे. डावीकडील वळणे शक्य तिथे विनाअथळा ठेवणे, वाहतुकीच्या प्रमाणानुसार बदलणारी अडॅप्टिव्ह सिग्नल प्रणाली वापरणे आणि अपघात टाळण्यासाठी पुरेशी दृश्यता राखणे यावरही भर दिला जाणार आहे. त्यासाठीचे वेळापत्रक आणि कोणत्या जंक्शनला प्रथम प्राधान्य दिले जाणार, याबाबतची माहिती पुढील प्रक्रियेत स्पष्ट होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT