Saptashrungagad 
नाशिक

Saptashrungagad traffic jam -सप्तशृंगगडावर भाविकांची फरपट

२ ते ३ तास ट्रॅफिक जाम, रोपवे आणि पायी मार्गावर प्रतीक्षा; नियोजनावर भाविकांचा संताप

पुढारी वृत्तसेवा

सप्तशृंगगड : देवीच्या दर्शनासाठी आलो, पण दिवस ट्रॅफिकमध्येच गेला. स्वातंत्र्यदिन, शनिवार आणि रविवारच्या सलग सुट्ट्यांमध्ये श्री सप्तशृंगगडावर आलेल्या हजारो भाविकांच्या तोंडून हेच शब्द ऐकायला मिळाले. घाट रस्त्यावर सुरू असलेल्या काँक्रिटीकरणाच्या कामामुळे संपूर्ण वाहतूक व्यवस्था कोलमडली आणि भाविकांचा उत्साह अक्षरशः मनस्तापात बदलला. धक्कादायक बाब म्हणजे, घाट रस्त्याचे हे काम गेल्या दीड ते दोन वर्षांपासून सुरू असूनही अद्याप पूर्णत्वास गेलेले नाही.

दरवेळी सुट्ट्या, सण - उत्सव किंवा मोठी यात्रा आली की, याच रखडलेल्या कामाचा फटका हजारो भाविक आणि स्थानिक नागरिकांना सहन करावा लागत आहे. तरीही कामाच्या गतीत कोणतीही सुधारणा होत नसल्यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. घाटात काँक्रिटीकरणामुळे एकेरी वाहतूक सुरू असल्याने पायथ्यापासून गडापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अनेकांना २ ते ३ तास वाहनातच अडकून राहावे लागले. पावसात लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक अक्षरशः फरपट झाली.

गडावर पोहोचल्यानंतरही भाविकांची परीक्षा संपली नाही. रोपवे ट्रॉलीसाठी २ ते ३ तासांची प्रतीक्षा, तर पायी दर्शन मार्गावरही तितकाच वेळ रांगेत उभे राहण्याची वेळ भाविकांवर आली. परिणामी, अनेक भाविकांनी मातेचे दर्शन न घेताच माघारी परतण्याचा निर्णय घेतला.

सुट्टीचा दिवस कुटुंबासोबत मातेच्या दर्शनासाठी राखून ठेवला होता. पण दर्शन तर दूरच, पूर्ण दिवस ट्रॅफिक आणि रांगांमध्येच संपला. एवढ्या मोठ्या गर्दीची कल्पना असूनही कोणतेही ठोस नियोज नव्हते, अशी संतप्त भावना भाविक व्यक्त केली. घाट रस्त्यावरील कामाम पर्यायी मार्गाची कोणतीही प्रभावी व्यवस नसल्यामुळे भाविक आणि स्थानि नागरिकांना एकाच मार्गावर अवलं राहावे लागत आहे. परिणामी, काम स असताना वाहतूक कोंडी हाज नित्याचाच भाग झाला आहे. प्रत्ये मोठ्या सुट्टीत आणि सणासुदीला ह मनस्ताप पुन्हा पुन्हा सहन करण्याची व येत आहे.

जबाबदारी नेमकी कोणाची?

भाविकांचा प्रश्न.. भाविकांच्या श्रद्धेची परीक्षा घेणारी ही परिस्थिती आता प्रशासनाने गांभीर्याने घेण्या गरज आहे. रखडलेली कामे, अपुरे नियोजन आणि पर्यायी व्यवस्थेचा अभाव यामुळे सप्तशृंगगडावर येणाऱ्या लाखो भाविकांचा प्रवास दिवसेंदिवस अधिक त्रासदायक होन असल्याची भावना व्यक्त होत आहे. श्रद्धेने आलेल्या भाविकांना दर्शनाऐवजी ट्रॅफिक प्रतीक्षा आणि गैरसोयींचीच भेट मिळत असेल, तर ही परिस्थिती बदलण्याची जबाबद नेमकी कोणाची? असा संतप्त प्रश्न भाविकांकडून उपस्थित केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT