Two sisters drown in Nashik | खेळता खेळता घराच्या गॅलरीतील पाण्याच्या टाकीत पडल्या दोन चिमुरड्या, बहिणींचा बुडून मृत्यू

मानेनगरातील घराच्या गॅलरीतील घटना
Two sisters drown in Nashik
Two sisters drown in Nashik
Published on
Updated on

पंचवटी : मेरी लिंक रोडवरील मानेनगर भागात खेळता खेळता घराच्या गॅलरीतील पाण्याच्या टाकीत पडल्याने तृप्ती विशाल सोनवणे (८) व स्वस्ति विशाल सोनवणे (६) या दोन सख्ख्या चिमुरड्या बहिणींचा बुडून मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे शोककळा पसरली.

शुभम कॉलनी येथील रहिवासी डॉ. विशाल सोनवणे यांचे रासबिहारी-मेरी लिंक रोडवर क्लिनिक आहे. त्यांची पत्नीही त्यांना वैद्यकीय व्यवसायात मदत करते. शनिवारी (दि. १५) सायंकाळी सोनवणे दाम्पत्य क्लिनिकमध्ये रुग्णांवर उपचार करत असताना दोन्ही मुली घरातच खेळत होत्या.

रात्री क्लिनिकमध्ये आलेल्या रुग्णाला सलाइन लावलेले असल्याने, डॉ. सोनवणे यांनी पत्नीला क्लिनिकमध्ये थांबवून घरी जाऊन मुलींना जेवू घातले. आई लगेच घरी येईल, असे सांगत त्यांनी किचनचा दरवाजा उघडा ठेवला आणि घराला बाहेरून कुलूप लावून ते पुन्हा क्लिनिकमध्ये निघून गेले. काही वेळाने सोनवणे क्लिनिक बंद करून घरी परतल्या. कुलूप उघडून आत प्रवेश केला असता दोन्ही मुली नजरेस पडल्या नाहीत. त्यांनी घाबरून शोधाशोध सुरू केली असता, किचनजवळील गॅलरीच्या पाण्याच्या टाकीचे झाकण उघडे दिसले. शंका आल्याने त्यांनी टाकीत डोकावून पाहिले असता एका मुलीचे केस पाण्यात दिसले.

Two sisters drown in Nashik
Girish Mahajan | ‘विकसित नाशिक’साठी विकासाचा वेग वाढविणार : मंत्री गिरीश महाजन

आईने तत्काळ तिला बाहेर काढले, तेव्हा दुसरी मुलगीही टाकीतच असल्याचे आढळले. शेजारी अमोल पोतदार व इतरांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही चिमुरड्यांना रात्री १०:३५ च्या सुमारास तातडीने खासगी हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासून रात्री ११.१० ला दोन्ही चिमुरड्यांना मृत घोषित केले. सामाजिक कार्यकर्ते पप्पू मानेंनी म्हसरूळ पोलिसांना माहिती दिली. पोलिस हवालदार कविश्वर खराटे व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रविवारी दुपारी चिमुरड्यांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Two sisters drown in Nashik
Nashik Gosaviwadi youth shot twice | पानटपरीसमोर उभ्या असलेल्या तरुणावर गोळ्या झाडल्या, गोसावीवाडीत थरार, हल्लेखोर पसार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news