Murder Case  Pudhari
नाशिक

Sanskriti Kale Murder Case | संस्कृती काळे खून प्रकरणात मोठी अपडेट! नाशिक पोलिसांचे पथक अकोल्याला रवाना, तपासाला वेग

Sanskriti Kale Murder Case | आजपासून विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

वाडीव-हे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सारुळ परिसरात घडलेल्या अल्पवयीन तरुणीच्या खून प्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांचे पथक अधिक तपासासाठी अकोला येथे रवाना झाले आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, खुनात वापरलेले वाहन जप्त करण्यात आले आहे. सारुळ येथील जंगल परिसरात २० फेब्रुवारीस संस्कृती सतीश काळे (१६) हिचा खून केलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला होता. घटनेची माहिती मिळताच नाशिक ग्रामीण पोलिस व सातपूर पोलिस ठाण्याच्या पथकांनी संयुक्तरीत्या तपास सुरू केला.

घटनास्थळावरील पुरावे, सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अवघ्या काही तासांत संशयित आरोपी अथर्व देशमुख व सुमित देवानंद सानप यांना ताब्यात घेण्यात आले. दोन्ही संशयितांकडे कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

खून प्रकरणात वापरलेले वाहन पोलिसांनी जप्त केले असून, त्याची तपासणी करण्यात येत आहे. मयत संस्कृती काळे ही बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील रहिवासी होती. तिची कौटुंबिक पार्श्वभूमी राजकीय असल्याने या घटनेची बुलढाणा जिल्ह्यासह परिसरात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.

दरम्यान, अटकेतील आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार तपासाची दिशा अकोल्याकडे वळली असून, नाशिक ग्रामीण पोलिसांचे पथक तेथे रवाना झाले आहे. या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने तपास अधिक व्यापक करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू असून, लवकरच आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT