Mandal Adhikari Attack  File Photo
नाशिक

Mandal Adhikari Attack | सांगोल्यात वाळू माफियांनी कायदा बसवला धाब्यावर ! महसूल कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला, गाडीची तोडफोड

Mandal Adhikari Attack | पांढरे वस्ती (जवळा) येथे अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना या व्यवसायातील जमावाने मारहाण केली.

पुढारी वृत्तसेवा

सांगोला : पुढारी वृत्तसेवा

पांढरे वस्ती (जवळा) येथे अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना या व्यवसायातील जमावाने मारहाण केली. तसेच, शासकीय गाडीवर दगडफेक केली.

बुधवारी पहाटे झालेल्या या दगडफेकीत दोन कर्मचारी जखमी झाले असून, शासकीय गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, याप्रकरणी सांगोला पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

सांगोला येथील मंडल अधिकारी महेश जाधव, मेडशिंगी तलाठी मयूर गोडसे व वाढेगाव कोतवाल समाधान सूर्यगंध हे येथील पांढरे वस्तीजवळ कोरडा नदीपात्रामध्ये अवैध वाळू उपसा MH 45 AL 8171 रोखण्यासाठी बुधवारी पहाटे गेले होते.

यावेळी संशयित अतुल शंकर गावडे व इतरांनी मिळून सांगोला तहसील कार्यालयाच्या गाडीवर (एम.एच. ४५ एएल ८१७१) दगडफेक करून मोठे नुकसान केले. दरम्यान, हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करून कडक कारवाई होत नाही तोपर्यंत बेमुदत काम बंद आंदोलनामध्ये सहभागी होत आल्याचे निवेदन तहसीलदार बाळुताई भागवत यांना महसूल कर्मचारी संघटनेने दिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT