Tradition Rahad Nashik | नाशकात १३० वर्षांपूर्वीची 'रहाड' सापडली! राजेबहाद्दर लेनमध्ये पेशवेकालीन परंपरेचा ठेवा पुन्हा जिवंत

Tradition Rahad Nashik | शहरात रंगपंचमीचा उत्सव पेशवेकालीन परंपरेनुसार रंगाने भरलेल्या रहाडीत 'धप्पा' देत अनोख्या पद्धतीने साजरा केला जातो.
Nashik News
Nashik News
Published on
Updated on

नाशिक : अंजली राऊत

शहरात रंगपंचमीचा उत्सव पेशवेकालीन परंपरेनुसार रंगाने भरलेल्या रहाडीत 'धप्पा' देत अनोख्या पद्धतीने साजरा केला जातो. सालाबादप्रमाणे यंदाही धूलिवंदनाच्या दिवशी या रहाडी खोदण्यास प्रारंभ झाला असून, राजेबहाद्दर लेन येथे बुधवारी (दि.४) रहाड सापडली आहे.

Nashik News
Goa Cyber Police | सायबर गुन्हेगारांना गोवा पोलिसांचा दणका! फसवणुकीची रक्कम गोठवण्यात गोवा देशात प्रथम

ही रहाड २५ बाय २५ फूट आकाराची आहे. शहरातील विविध भागांत सुमारे २५ बाय २५ फूट आकाराचे आणि सुमारे आठ फूट खोलीचे दगडी हौद अर्थात, रहाडी पेशव्यांच्या काळात खोदलेल्या रहाड पुरातन काळातील परंपरेची साक्ष देत आहेत.

त्याचप्रमाणे राजेबहाद्दर लेन येथील १३० वर्षांपूर्वीची रहाड बुधवारी (दि.४) मिळून आल्याने यंदा रंगपंचमीचा उत्साह द्विगुणित होणार आहे. यावेळी राजेबहाद्दर लेन मित्रमंडळाचे आनंद चौघुले, जितेंद्र ठाकूर, सचिन औटी, पवन सोनवणे, अक्षय चौघुले आदी उपस्थित होते.

Nashik News
“अॅमेझॉनला आम्हाला नष्ट करायचे होते आणि ते यशस्वी झाले…” : अॅमेझॉनशी वादात फ्यूचर रिटेल ने SC मध्ये सांगितले

यंदा दिल्ली दरवाजा, तिवंधा चौक, दंडे हनुमान मित्रमंडळ, कथडा शिवाजी चौक, तांबट गल्ली चौक, मधली होळी, शनी चौक मित्रमंडळ, गोदाघाट आणि राजेबहाद्दर लेन अशा नऊ रहाडींचा आनंद नाशिककरांना मिळणार आहे.

१९९७ मध्ये काही 66 कामास्तव या ठिकाणी खोदकाम करण्याचे काम सुरू होते. त्यावेळीच आम्हाला रहाडीच्या खुणा सांगणारे कठडे आढळून आले. त्यानुसार यंदा आम्ही मनपाची परवानगी घेऊन खोदकामास सुरुवात केली आणि यशस्वी प्रयत्नानंतर पेशवेकालीन १३० वर्षांपूर्वीची रहाड मिळून आली आहे. या रहाडीसाठी गुलाबी रंग राहणार असून, नाशिककरांना यंदा रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर या रहाडीचा आनंदही लुटता येणार आहे. - नीलेश कुसमोडे, राजेबहाद्दर लेन मित्रमंडळाचे अध्यक्ष

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news