बागलाण तालुक्यातील साल्हेर-सालोटा या महाराष्ट्रातील सर्वात उत्तुंग व देशातील दुसऱ्या क्रमाकांचा सर्वाधिक उंच जोड किल्ल्यांचा 'युनेस्को'तर्फे जागतिक वारसा स्थळांचा दर्जा मिळाला आहे. Pudhari News Network
नाशिक

Salher Fort : 'साल्हेर' ची लढाई जिंकली! आता 'खरे युद्ध' पुढेच.!!

साल्हेरला जागतिक स्थळांचे मानांकन

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : निल कुलकर्णी

'मराठा सामाज्यातील लष्करी भू प्रदेश' या नावाखाली छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी साम्राज्याशी निगडीत बारा किल्ल्यांना नुकताच 'युनेस्को'तर्फे जागतिक वारसा स्थळांचा दर्जा मिळाला. बागलाण तालुक्यातील साल्हेर-सालोटा या महाराष्ट्रातील सर्वात उत्तुंग व देशातील दुसऱ्या क्रमाकांचा सर्वाधिक उंच जोड किल्ल्यांचाही त्यात समावेश झाला. साल्हेरला जागतिक स्थळांचे मानांकन मिळवणेही हे काम नक्किच सोपे नव्हते. सतत नऊ वर्ष यासाठी दस्ताऐवजासह अन्य तथ्थे, पुरावे, आदींचे सुयोनियोजीत सादरीकरण करावे लागले.

जागतिक वारसा स्थळ मानांकनाची ही लढाई आपण जिंकलो. जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक, राज्य पुरातत्व विभाग, केंद्रिय पुरातत्व विभाग आणि अन्य संस्थांनी मिळून केलेल्या परिश्रमाने किल्ल्यांला 'वर्ल्ड हेरीटेज'चा दर्जा मिळाला! मात्र, आता मिळालेले मानांकन राखण्याचे खरे महायुद्ध यापूढे सुरु झाले आहे. शासन, प्रशासनाला 'साईट मॅनेंजमेंट प्लान'चे, शिवप्रेमींची सुरक्षितता, डिझास्टर व्यवस्थापन, विकास नियाेजन आराखडा आणि पर्यटकांना आचारसंहिता आदींचे आव्हान पेलावे लागणार आहे. किल्ल्याच्या परिसरात मद्यसेवन करुन हु्ल्लडबाजी करणे, हाणामारी, किल्ला परिसरात कुठलेही अनुचित प्रकार तसेच अनैतिक कृत्य होणार नाही, किल्ल्याचे पावित्र, गरिमा अबाधित राहावा, यासाठी पर्यटकांसह सर्वच यंत्रणांचा मोठी व सामुहिक जबाबदारी असणार आहे. तेव्हाच शिवरायांचे शौर्य, जाज्वल्य राष्ट्रभक्ती व तेजस्वी हिंदूत्ववाद यांचे प्रतीक असलेल्या या किल्ल्याचे पावित्र व मानांकन राखता येणार आहे. 'वर्ल्ड हेरिटेज'चा दर्जा मिळल्यानंतर सर्वप्रथम दै. 'पुढारी'ने किल्ल्यावर जाऊन केलेल्या 'स्पॉट रिपोर्टिंग' चा 'आंखोदेखा' अहवाल!

जागतिक वारसा स्थळ मानांकनाची ही लढाई आपण जिंकलो. जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक, राज्य पुरातत्व विभाग, केंद्रिय पुरातत्व विभाग आणि अन्य संस्थांनी मिळून केलेल्या परिश्रमाने किल्ल्यांला 'वर्ल्ड हेरीटेज'चा दर्जा मिळाला! मात्र, आता मिळालेले मानांकन राखण्याचे खरे महायुद्ध यापूढे सुरु झाले आहे. शासन, प्रशासनाला 'साईट मॅनेंजमेंट प्लान'चे, शिवप्रेमींची सुरक्षितता, डिझास्टर व्यवस्थापन, विकास नियाेजन आराखडा आणि पर्यटकांना आचारसंहिता आदींचे आव्हान पेलावे लागणार आहे. किल्ल्याच्या परिसरात मद्यसेवन करुन हु्ल्लडबाजी करणे, हाणामारी, किल्ला परिसरात कुठलेही अनुचित प्रकार तसेच अनैतिक कृत्य होणार नाही, किल्ल्याचे पावित्र, गरिमा अबाधित राहावा, यासाठी पर्यटकांसह सर्वच यंत्रणांचा मोठी व सामुहिक जबाबदारी असणार आहे. तेव्हाच शिवरायांचे शौर्य, जाज्वल्य राष्ट्रभक्ती व तेजस्वी हिंदूत्ववाद यांचे प्रतीक असलेल्या या किल्ल्याचे पावित्र व मानांकन राखता येणार आहे. 'वर्ल्ड हेरिटेज'चा दर्जा मिळल्यानंतर सर्वप्रथम दै. 'पुढारी'ने किल्ल्यावर जाऊन केलेल्या 'स्पॉट रिपोर्टिंग' चा 'आंखोदेखा' अहवाल!

किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग

  • समुद्रसपाटीपासून उंची : १५६७ मीटर( सुमारे ५,३०० फूट). कळसुबाई शिखरानंतर सर्वात उंच

  • महाराष्ट्रातील सर्वाधिक उत्तुंग व देशातील क्रमांक दोनचा उंच दुर्ग.

  • वाघांबे दरवाजाकडे जातांना १६ कोरीव लेणी. मात्र त्यात मूर्ती-शिल्प नाहीत.

  • किल्ल्यावर तलाव, हौद, परशरुराम मंदिर, देवीची मंदिर. शिलालेख, पाषाण चिरे दरवाजे

  • मुख्य पठारावर मोठ्या गुहेत बडोदा संस्थानच्या काळात किल्लेदाराचे कार्यालय होते.

विकास आरखड्याच्या शिल्पकार

नामांकनासाठी विकास आरखड्याच्या शिल्पकार आर्कीटक्चर स्मिता पाटील अत्यंत नियाेजनबद्ध, निसर्गपूरक आराखडा आखला. त्यात किल्ल्याच्या पायथ्याशी पर्यटकांसाठी डॉरमेंट्री( मुक्कामासाठी निवास), वस्तुसंग्रहालय, इंटरॲक्टीव्ह सेंटर, ॲम्फी थिएटर्स (खुला रंगमंच) आदींचा समावेश आहे.

  1. किल्ल्याच्या पाषाण तटबंदी, दरवाजे इ.चे संवर्धन, पाण्याचे टाक्यांची नियमित सफाई.

  2. पर्यटकांसाठी पिण्याचे पाणी, प्रसाधन गृह, पर्यावरणपूरक वृक्षांच्छादित वाहनतळ इ. सोयी

  3. किल्ल्यावर वरपर्यंत जाता न येणाऱ्या पर्यटकांसाठी परिसर विकास, माहिती केंद्र

  4. परिसरातील लोकांसाठी मार्गदर्शक सेवेसाठी(गाईड) प्रशिक्षण

  5. स्थानिक लोकांसाठी पर्यटन क्षेत्रासंबंधीत(गावात होम स्टे साठी न्याहरी निवारा) आदी रोजगार निर्मिती.

यामुळे 'मानांकना'ला धाेका

  • वारसा स्थळाचे आंतरराष्ट्रीय मानकांनुसार सुनियोजित व्यवस्थान व कार्यान्वयन न झाल्यास

  • आतंरराष्ट्रीय मानकांनुसार पर्यटकांना स्वच्छतागृह, शुद्ध पेयजल यांची सुविधा न मिळणे,

  • स्थळाची रमणीयता, पुरातत्व नियम, निकषांनुसार सुनियोजीत संवर्धन न होणे

  • 'इर्मजन्सी' अपघात, पर्यटक जखमी झाल्यास, प्रकृती बिघडल्यावर त्यांना तत्काळ वैदयकीय सुविधा न मिळणे.

  • किल्ला परिसरात चोरी, हाणामारी, गैरकृत्य, मद्पान करुन गोंधळाचे प्रदर्शन, अश्लील कृत्य होणे.

तरुणाईचे आव्हान?

साल्हेरवाडी गावातून किल्ल्यावर जाताना अनेक ठिकाणी दारुच्या बाटल्या, प्लाॅस्टिकचे पिशव्या, पाण्याचे बाटल्या यांची प्रदुषण दिसून आले. विशेषत: गुजरातमध्ये दारुबंदी असल्याने तेथील तरुणाईचा समावेश अधिक होता. महाराजांच्या शौर्याने पुनित झालेल्या या अजस्त्र, उतुंग किल्ल्यावर मानांकन मिळाल्यानंतरही अनेकांनी दारु, मौजमजेसाठी वापर केल्याचे वाईट चित्र दिसून आले. वर खाण्याचे पदार्थ मिळत नाही परंतु खालूनच तरुणाई चिप्स, चिवडा, खाद्यपदार्थांचे पॅकेट घेऊन वर त्याचा कचरा करताना आढळले. इतकेच नाही तर किल्ल्यावर चढताना अनेक ठिकाणी दारुच्या बाटल्या, सिगारेटची थोटके आढळली. स्थानिक गाईड शिवप्रेमी शांताराम मोरे आणि अन्य गावकरी मदयच्या बाटल्या घेऊन गडावर जाणाऱ्या आणि हु्ल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांविरोधात मोहिम राबवत आहेत. मात्र, पर्यटकांच्या वाढत्या संख्येवर २४ तास नजर ठेवताना त्यांच्या कामावरही मर्यादा येत आहे. स्थानिक लोकांनी एकत्र येऊन आता मद्यपी, टवाळखोर आणि हु्ल्लडबाजी करणाऱ्या तरुणांविरुद्ध आवाज उठवलेला दिसून आला. विशेष म्हणजे या दूर्गप्रेमी स्थानिकांना पुरातत्व विभाग, पोलिस आणि वनविभागाकडूनही साथ आणि कायदेशीर पाठिंबा पुरवला जात आहे.

आपत्ती व्यवस्थापनाची तत्काळ सज्जता

साल्हेर गावातून किल्ल्यावर चढण्यासाठी अत्यंत बिकट वाट आहे. एकीकडे खोल दऱी, अरुंद, खडकाळ पायवाट, शेवाळ्यामुळे निसरडी झालेल्या वाटा, उतुंग उंचीमुळे दिशाभूल होणाऱ्या रान वाटा यामुळे किल्ला चढणे आव्हानात्मक व जिकरीचे आहे. अनुभवी गिर्याराेहकांप्रमाणे येथे आरोहण, चढाई, करणे क्रमप्राप्त असल्याने त्यामुळे गिर्यारोहणाची सवय नसलेल्या पर्यटकांचा अरुंद वाटेवरुन घसरून इजा होणे, अप्रिय घटना घडण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे सर्वात प्रथम येथे स्थानिक गाईड, वाटाडे आणि डिझास्टर व्यवस्थापनाचा चमू सज्ज ठेवण्याचे काम करावे लागणार आहे.

साल्हेर किल्ला दरवाजा

चेकपॉईंटही अत्याश्यक

किल्ल्याची चढाई करण्यासाठी तीन प्रमुख वाटा आहेत. मात्र अद्यापही येथे चेकपॉईंट नसल्याने किती पर्यटक वर गेले आणि किती वापस आले याची कुठलिही नोंद ठेवली जात नाही. लवकरच यासाठी चेकपॉईंट तयार केले जाणार असल्याची माहिती वनविभाग तसेच पुरातत्व विभागाचे अधिकाऱ्यांनी दिली. धोकादायक वाटेची बांधणी करुन त्यावर पायऱ्या करणे, किल्ल्यावरील धोकादायक तलाव हाैद यावर संरक्षक जाळी लावणे, यासह कुठल्यही परिस्थितीत पर्यटक कि्ल्ल्यावर मुक्काम करणार नाही, अशी सुरक्षा यंत्रणा विकसित करावी लागणार आहे.

अप्रिय घटनांची मालिका थांबवण्याचे आव्हान

किल्ल्यावर गेलेल्या पर्यटकांचा दरीत कोसळून सुटकेसाठी पोलिसांशी संपर्क न होणे, डिझास्टर यंत्रणा, स्थानिकांना वर गेलेल्या पर्यटकांबद्दल वेळेत मदतीची माहिती न मिळणे, सुटका करणाऱ्य यंत्रणा वेळेवर न पोहचणे, मोबाईल रेंजचा अभाव यामुळे अनेक तरुण पर्यटकांंना येथे केवळ मदत न मिळाल्याने आपला जीव गमवावा लागला आहे. या आणि अशा घटनांमध्ये मृत्यू होणे, पर्यटक गंभीर जखमी हाेणे, किल्ल्यावर जाऊन खून मारामारी करणे, या आणि अशा घटना यापूर्वी अनेकदा घडल्याचे स्थानिकांनी सांगितले. आता यानंतर अशा अप्रिय घटना किल्ला परिसरात होणार नाही यासाठी शासन, प्रशासनाला कडक उपाययोजना, मजबूत डिझास्टर यंत्रणा उभी करावी लागणार आहे. किल्ल्यावर जाणाऱ्या खुष्कीच्या वाटा बंद करुन मोजक्याच ठिकाणी प्रवेश आणि निर्गम हा नियम करावा लागणार आहे.

स्थानिकांच्या सहभागाने 'ही' लढाई शक्य

साल्हेर किल्ल्याला जागतिक वारसा स्थळाचे मानांकन टिकवण्यासाठी पुरातत्व, वन, पर्यटन या विभागांसह ग्रामपंचायत, स्थानिकांच्या सामुदायिक प्रयत्नातून सर्वांनाच प्रयत्नाची पराकाष्टा करावी लागणार आहे. किल्ला विकासाचा नियोजित आरखडा तयार आहे. तो पूर्ण होण्यास कदाचित पाच वर्षांहून अधिक वर्ष लागणार आहेत. परंतु मिळालेले नामांकन राखणे आणि छत्रपतीशिवरायांच्या पराक्रमाचा हे स्थळ पावित्र्य जपणे हे सर्वच यंत्रणांची आद्य प्राधान्य व्हावे, अशी अपेक्षा दुर्गप्रेमीं, शिवभ तांनी केली आहे.

लोकप्रतिनिधी, अधिकारी, स्थानिक म्हणतात - किल्ल्याच्या पायथ्याशी ४० एकर जागेत शिवसृष्टीसाठी शासनाला प्रस्ताव पाठवला आहे. आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवणारे वस्तुसंग्रहालय उभारण्याचा संकल्प आहे. बफर परिसरात पर्यटनवाढीसाठी नियोजन आहे.
दिलीप बोरसे, आमदार, कळवण.
साल्हेरच्या आसपासच्या परिसरातील किल्ल्याचे जतन, सुरक्षा आदी कामे करुन तिथेही पर्यटकांचा ओघ वाढवा यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. मानांकनामुळे भारताची प्रतिमा जागतिक नकाशावर पाेहचली आहे. ती राखण्यासाठी पर्यटकांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे.
अमोल गोटे, सहसंचालक, पुरातत्व विभाग
कालिका मंदिरापर्यंत एक आणि सरदार समाधी पर्यंत दुसरा असे दोन रस्ता बांधण्याचे नियोजन आहे. वॉच टॉवर, गझिबो(पागोडा) छत्री, दोन्ही प्रवेश व्दारांवर चेक पॉईंट करणे, अशी विकासकामे करणार आहोत. वनविभागाचे जागेवर किल्ल्याला तारकुंपण बांधणे सुरु आहे. सुरक्षेसाठी मनुष्यबळ वाढवणार आहोत.
प्रभाकर पवार, वनपाल साल्हेर वनपरीक्षेत्र, ताहराबाद
'युनेस्को'चे हे मानांकन मोठी उपलब्धी आहे. साल्हेर-सलोटासह आजुबाजूच्या परिसराचाही मोठा विकास होणार आहे. हे मानांकन राखणे अत्यंत महत्वपूर्ण असून त्यासाठी सर्वांनीच किल्ल्याचे पावित्र जपण्यासह वारसास्थळाची आदर्श आचारसंहिता पाळावी असे आवाहन करताे.
गिरीश टकले. इतिहास संशोधक.
पुरातत्व, वनविभागाच्या विकास आरखड्यात साल्हेर ग्रामपंचायतीचाही समावेश करुन निधी उपलब्ध व्हावा. स्थानिक खाद्यसंस्कृती, आदिवासी तसेच लोकनृत्य, परंपरा पर्यटकांसमोर सादर करण्यासह स्थानिकांचे उत्पन्न वाढावे यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. निवारा, जेवणाचाही सोय करणार आहोत.
राणी मधुकर भोयर. माजी सरपंच, साल्हेरवाडी.
गड व्यवस्थापनात स्थानिकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध होतील यासाठी प्राधान्य द्यावे. चेकपाईंट, पार्कींग आदी ठिकाणी गावकऱ्यांना सहभागी करुन घ्यावे.
शांताराम मोरे, स्थानिक गाईड.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT