Rohit Pawar On Corrupt Ministers :
राष्ट्रवादी शरद पवार गटानं आज (दि १५) नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मोर्चाचं आयोजन केलं आहे. यापूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गाटाचे आमदार रोहित पवार यांनी पुढारी न्यूजचे संदीप राजगोळकर यांच्याशी बातचीत केली. यावेळी त्यांनी सरकार भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या मंत्र्यांविरूद्ध कारवाई करत नाही अशी टीका केली. त्यांनी हे सरकार घमंडी झालं आहे. त्यांचा माज उतरवण्याची वेळ आली असल्याचं वक्तव्य केलं.
आज नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात राष्ट्रवादीने मोर्चाचं आयोजन केलं आहे. या मोर्चात सुप्रिया सुळे, शशिकांत शिंदे, जयंत पाटील, रोहित पवार हे या मोर्चामध्ये सामील होणार आहेत. त्यापूर्वी बोलताना रोहित पवार यांनी नाशिकमधील आदिवासी आयुक्तालयासमोर बसलेल्या आंदोलकांची भेट घेतली.
त्यानंतर ते म्हणाले, 'भाजप सरकारचा खाजगीकरणाकडे कल.10 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्तची कामे ठेकेदारांना देण्यात आली आहेत. यातील बहुतेक कॉन्ट्रॅक्टर भाजपाच्या विचारांचे आहेत. नेत्यांना फायदा व्हावा म्हणून सरकारी भरती बंद करून ठेकेदारांमार्फत भरती सुरू केली आहे. आदिवासी विभागात खाजगीकरण नको. आम्ही देखील खाजगीकरणाविरोधात अधिवेशनात हा मुद्दा मांडणार आहोत.
ते पुढे म्हणाले, ' सामाजिक विषयात राजकारण येऊ नये याची काळजी आम्ही घेतो. मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांना आंदोलक अनेकवेळा भेटले. सरकार केवळ पैसेवाल्यांची भूमिका घेतं. आदिवासींना न्याय मिळवून देईल असे वाटत नाही.'
दरम्यान, रोहित पवार यांनी भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या मंत्र्यावरील कारवाईवर देखील आपलं मत मांडलं. ते म्हणाले, 'एकतर या सरकारला घमंड आहे. अहंकार आहे. त्यांचं असं मत आहे की आमचे सर्वात जास्त आमदार निवडून आले आहेत. ते कसे निवडून आले आहेत हे सर्वांना माहिती आहे. त्यांना घमंड असल्यानं कोणचाही विकेट पडत नाहीये. हजारो कोटींचा भ्रष्टाचार करून सुद्धा, त्याचे पुरावे देऊन सुद्धा जर राजीनामा घेतला जात नसेल तर हा कुठं ना कुठं तरी अहंकार आहे. माजलंय सरकार... त्यांचा माज उतरवण्याची वेळ आलेली आहे.