NRI Marathi exam (File Photo)
नाशिक

NRI Marathi Students | परदेशात दुमदुमला मराठीचा गजर! अमेरिका, कॅनडा, नॉर्वेतील 204 मुलांनी दिली मराठी परीक्षा

NRI Marathi Students | अमेरिका, कॅनडा, डेन्मार्क, नॉर्वेतील २०४ विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
परदेशात स्थायिक झालेल्या मराठी मुलांना मराठी भाषेचे ज्ञान मिळावे, त्यांना मातृभाष्याची ओळख राहावी आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीशी त्यांची नाळ कायम जोडलेली राहावी, यासाठी बृहन्महाराष्ट्र मंडळ उत्तर अमेरिका आणि महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाच्या पुढाकाराने मराठी भाषेची मूल्यमापन परीक्षा घेण्यात येत आहे.

सामंजस्य करारानुसार सुरू असलेल्या या उपक्रमाला यंदा परदेशातील विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गतवर्षीच्या तुलनेत यंदा दुप्पटीने वाढ झाली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर परदेशातील मराठी भाषा संवर्धनाच्या उपक्रमांना महत्त्व प्राप्त झाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर परदेशातील नव्या पिढीला मराठी वाचन, लेखन आणि आकलनाचा सराव व्हावा, या उद्देशाने ही परीक्षा घेतली जाते.

यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक पातळीवर मराठीचे मूल्यमापन करण्याची संधी मिळत आहे. पालकांमध्ये याबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. गतवर्षी अमेरिका, कॅनडा व डेन्मार्कच्या ६० शाळांतील ९०३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.

त्यावेळी अमेरिकेतील परीक्षार्थींची संख्या ६७ होती. यंदा अमेरिका, कॅनडा, डेन्मार्कसह नॉर्वेतील विद्यार्थ्यांचाही सहभाग वाढला आहे. अमेरिकेतील संख्या यंदा ६७ वरून १६४ वर पोहोचली आहे. यंदाची परीक्षा १७ मे रोजी झाली.

परीक्षेचा निकाल १८ ऑगस्ट रोजी दुपारी ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला. विविध देशांत मराठी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतल्यामुळे उपक्रमाला आंतरराष्ट्रीय स्वरूप आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT