Emergency Rescue Training | नाशिक जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनाचे धडे! 29 ऑगस्टपासून 6 तालुक्यांमध्ये प्रात्यक्षिकांचे आयोजन

Emergency Rescue Training | भूकंप अन् पुराचा धोका रोखण्यासाठी 'ॲक्शन प्लॅन'; राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा पुढाकार
Earthquake
Earthquake
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक जिल्ह्यात अलीकडील काळात जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्यांसह पावसाळ्यातील अतिवृष्टी, पूर आणि दरडींचा संभाव्य धोका लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी प्रशिक्षण व जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील विविध तहसील कार्यालयांच्या परिसरात भूकंपविषयक प्रशिक्षण, शोध व बचाव कार्याचे प्रात्यक्षिक तसेच जनजागृती करण्यात येणार आहे.

Earthquake
Maharashtra Water Conservation | नाशिक विभागातील 5 जिल्ह्यांत जलसंधारण विभागाला 'कार्यकारी' बळ; 3 वर्षांपासून रिक्त असलेली पदे भरली

भूकंप, पूर किंवा अन्य नैसर्गिक आपत्ती अचानक उद्भवल्यास पहिल्या काही मिनिटांत मिळणारी मदत जीव वाचवण्यासाठी महत्त्वाची ठरते. त्यामुळे स्थानिक प्रशासन, अधिकारी-कर्मचारी, बचाव पथके तसेच नागरिकांना आपत्तीच्या काळात घ्यावयाची खबरदारी, सुरक्षित स्थानांतर, प्राथमिक बचावकार्य आणि उपलब्ध साधनसामग्रीचा योग्य वापर याबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे.

या प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात २९ ऑगस्टला त्र्यंबकेश्वर तहसील कार्यालयाच्या परिसरातून होणार आहे. त्यानंतर ३१ ऑगस्टला इगतपुरी, १ सप्टेंबरला दिंडोरी आणि पेठ, २ सप्टेंबरला सुरगाणा, ३ सप्टेंबरला कळवण तहसील कार्यालयाच्या परिसरात प्रशिक्षण व जनजागृती कार्यक्रम होणार आहेत.

शोध व बचावाचे प्रात्यक्षिक

प्रशिक्षण कार्यक्रमात 'शोध व बचाव' या बाबीला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. आपत्तीग्रस्त ठिकाणी अडकलेल्या व्यक्तींचा शोध घेणे, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढणे, जखमींना प्राथमिक मदत देणे आणि बचाव पथकांशी समन्वय साधणे याबाबत प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाणार आहे.

भूकंपाच्या वेळी नागरिकांनी घाबरून न जाता सुरक्षित ठिकाणी जाणे, इमारतींमधून सुरक्षितपणे बाहेर पडणे, विद्युत व गॅसपुरवठ्याबाबत खबरदारी घेणे तसेच जखमींना मदत करण्याच्या पद्धती याबाबतही मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

Earthquake
Maharashtra Water Conservation | नाशिक विभागातील 5 जिल्ह्यांत जलसंधारण विभागाला 'कार्यकारी' बळ; 3 वर्षांपासून रिक्त असलेली पदे भरली

पूरस्थितीत सुरक्षित स्थलांतरावर भर

इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, पेठ, दिंडोरी आणि कळवण या तालुक्यांमध्ये पावसाळ्यात अतिवृष्टी, नदी-नाल्यांना पूर, दरडी कोसळणे आणि रस्ते वाहून जाण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पूरस्थितीत धोकेदायक ठिकाणांची ओळख, नागरिकांचे सुरक्षित स्थानांतर, आपत्कालीन संपर्क यंत्रणा आणि मदत-बचाव पथकांशी समन्वय याबाबतही जनजागृती केली जाणार आहे.

स्थानिक पातळीवरील प्रतिसाद यंत्रणा सक्षम होणार (चौकट)

आपत्तीच्या वेळी केवळ सरकारी यंत्रणेवर अवलंबून न राहता स्थानिक नागरिक, ग्रामपंचायती, स्वयंसेवी संस्था, महसूल व पोलिस यंत्रणा आणि बचाव पथकांमध्ये प्रभावी समन्वय असणे आवश्यक आहे. या प्रशिक्षणातून स्थानिक पातळीवर आपत्तीला तातडीने प्रतिसाद देण्याची क्षमता विकसित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news