नाशिक : पुढारी वृत्तसेवा
अखिल अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेच्या मासिक सभेत कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदावर पुन्हा प्रा. रवींद्र कदम यांची, तर प्रमुख कार्यवाहपदी सुनील ढगे यांची सर्वानुमते निवड करण्यात आलेली आहे.
परिषदेच्या नाशिक शाखेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पुढील पंचवार्षिक निवडणूक २०२६-२०३१ बिनविरोध व्हावी, अशी भूमिका सभासदांनी घेतली होती. तसेच कार्यकारिणीतील नावेही ठरवली होती. त्यानुसार १९ जणांची नावे मध्यवर्ती शाखेकडे पाठविण्यात आलेली होती. पहिल्या मासिक सभेत कार्यकारिणीतील सदस्यांना जबाबदारीचे वाटप करण्यात आले.
यात अध्यक्षपदावर प्रा. रवींद्र कदम, उपाध्यक्ष म्हणून डॉ. अनिरुद्ध धमर्माधिकारी, राजेश भुसारे, प्रमुख कार्यवाहपदी सुनील ढगे,
खजिनदार : महेश डोकफोडे, तर सहकार्यवाह म्हणून राजेश जाधव, विजय शिंगणे आणि ईश्वर जगताप यांच्या नावावर सर्व सदस्यांनी एकमताने शिक्कामोर्तब केले आहे. कार्यकारिणीत चंद्रकांत जाडकर, विजय रावळ, उमेश गायकवाड, विशाल जातेगावकर, अभय ओझरकर, श्याम लोंढे, पीयूष नाशिककर, विनोद राठोड, मोहिनी भागरे, आनंद जाधव, कृतार्थ कंसारा हे सदस्य काम करणार आहेत. याशिवाय सहा निमंत्रित सदस्यांमध्ये संजय भुजबळ, स्वप्नील तोरणे, श्रिया जोशी, विक्रम गवांदे,
लवकरच येत्या काही दिवसांत बालरंगभूमीसाठीसुध्दा स्वतंत्र्य कार्यकारिणी जाहीर होणार आहे. दरवर्षी सर्वसाधारण सभा होईल. त्यासाठी पुन्हा एकदा नव्याने कार्यकारिणी निवडली जाणार आहे.रवींद्र कदम, अध्यक्ष