नाशिक शहर व परिसरात मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. (छाया : हेमंत घोरपडे)
नाशिक

Rain News Nashik | पहिल्याच दिवशी बरसल्या 'श्रावण'सरी; पुढील 48 तास संततधार बसरत राहणार

आगामी 48 तास रिमझिम पावसाचा अंदाज

पुढारी वृत्तसेवा

Light to moderate rains likely over Konkan, Madhya Maharashtra and Ghats in the next 48 hours

नाशिक : श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी नाशकात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. गत आठ दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने दिवसा उकाडा जाणवत होता. मात्र पावसांच्या सरींमुळे वातावरण आल्हाददायक आणि उत्साही बनले.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील 48 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि घाटमाथ्यावर हलक्यापासून मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नाशिकमध्ये देखील रिमझिम सरी कायम राहण्याची शक्यता आहे.

श्रावण महिन्यात संपूर्ण महिनाभर पाऊस, व्रतवैकल्ये, गंगास्नान आदींमुळे उत्साह राहणार आहे. ऊनपावसाच्या खेळामुळे निसर्गही बहरतो. श्रावण महिन्याच्या प्रारंभीच निसर्गाने कृपा दाखवत शुक्रवारी (दि.25) पहाटेपासूनच नाशिक शहर व परिसरात मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. शहरातील पंचवटी, गंगापूर, कॉलेज रोड, इंदिरानगर आदी भागांत सकाळपासूनच रिमझिम पावसाचे वातावरण होते.

सकाळी सात वाजल्यापासून सरी सुरू झाल्या मात्र अधूनमधून पावसाचा जोर वाढत होता. रस्त्यांवर शाळकरी मुले, कामानिमित्त बाहेर पडलेले नागरिक छत्री व रेनकोटचा वापर करीत धावपळ करताना दिसले. पावसामुळे काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाला असला तरी हवामान आल्हाददायक झाले आहे. श्रावणाच्या सुरुवातीलाच झालेल्या या पावसामुळे शेतकरी वर्गामध्येही आनंदाचे वातावरण आहे. आतापर्यंत झालेल्या पावसामुळे काही भागांतील पेरण्या पूर्ण झाल्या असून, या सरींमुळे पिकांना फायदा होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT