Nashik Road Encroachment Case 
नाशिक

Nashik Road Encroachment Case | माजी नगरसेवक-नगरसेविका पतीची भररस्त्यात वादावादी

Nashik Road Encroachment Case | देवळाली गाव परिसरातील सोमवार आठवडे बाजाराच्या अतिक्रमणावरून सोमवारी (दि. ६) सायंकाळी सुराणा चौकात माजी नगरसेवक व विद्यमान नगरसेवकाचे पती यांच्यातील वादामुळे अतिक्रमण निर्मूलन पथकाला कारवाई न करता माघारी फिरावे लागले.

पुढारी वृत्तसेवा

नाशिकरोडः पुढारी वृत्तसेवा

देवळाली गाव परिसरातील सोमवार आठवडे बाजाराच्या अतिक्रमणावरून सोमवारी (दि. ६) सायंकाळी सुराणा चौकात माजी नगरसेवक व विद्यमान नगरसेवकाचे पती यांच्यातील वादामुळे अतिक्रमण निर्मूलन पथकाला कारवाई न करता माघारी फिरावे लागले.

देवळाली गाव येथील सोमवार बाजार हा दत्त मंदिर रोड ते आर्टिलरी सेंटर रोड तसेच महात्मा गांधी पुतळा ते साठेनगर या पट्ट्यात भरतो. सुराणा चौक परिसरातील अतिक्रमण हटविण्यासाठी अतिक्रमण निर्मूलन पथक घटनास्थळी दाखल झाले.

काही विक्रेत्यांचा माल हटविण्यास सुरुवात होताच यावरून स्थानिक प्रतिनिधींमध्ये वाद निर्माण झाला होता. वादाचे रूपांतर शाब्दिक चकमकीत होऊन तणाव निर्माण झाला.

या बाजारामुळे अनेक गरीब शेतकरी व महिला विक्रेत्यांचा उदरनिर्वाह होत असल्याची भूमिका माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे यांनी मांडली, तर दुसरीकडे सुराणा चौकात वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्यामुळे तसेच परिसरातील रुग्णालयांकडे जाणाऱ्या रुग्णवाहिकांना अडचणी येत असल्याच्या तक्रारींमुळे अतिक्रमण हटविणे आवश्यक असल्याचा दावा नगरसेविका श्वेता भंडारींचे पती निर्मल भंडारी यांनी केला होता. त्यामुळे लवटे आणि भंडारी यांच्या भर रस्त्यात शाब्दिक वादावादी झाल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. तणाव टाळण्यासाठी अतिक्रमण निर्मूलन पथक कारवाई न करता माघारी परतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT