Anganwadi Nutrition Food  
नाशिक

Anganwadi Nutrition Food | पोषण आहाराच्या बंद पाकिटात मृत पक्षी

Anganwadi Nutrition Food | देवगाव येथील अंगणवाडीत पोषण आहाराच्या बंद पाकिटात आढळला मृत पक्षी; लाभार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण, सखोल चौकशीची मागणी

पुढारी वृत्तसेवा

देवगाव : पुढारी वृत्तसेवा

एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प निफाड-१ अंतर्गत देवगाव बिट क्रमांक २ मधील हनुमान मंदिराजवळच्या इंदिरानगर अंगणवाडी केंद्रातून लाभार्थ्यांना घरपोच पोषण आहाराचे वाटप करण्यात आले. मात्र, या पोषण आहाराच्या बंद पाकिटात मृत पक्षी आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

देवगाव येथील प्रशांत कुलकर्णी यांच्या माहितीनुसार, सुकदेव सदाशिव माळी यांची मुले आराध्या आणि आदित्य हे संबंधित अंगणवाडी केंद्राचे लाभार्थी आहेत. त्यांना दिलेले पोषण आहाराचे पाकीट उघडताच त्यामध्ये कुजलेल्या अवस्थेतील मृत पक्षी आढळला.

हा प्रकार लक्षात येताच कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. त्यांनी तत्काळ याबाबत संबंधितांना माहिती दिली असून, या घटनेचे छायाचित्रही उपलब्ध आहे.

अंगणवाडीमधून वितरित होणारा पोषण आहार हा लहान बालके, गर्भवती आणि स्तनदा मातांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. अशा संवेदनशील योजनेत अन्नसुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण करणारा हा प्रकार उघड झाल्याने लाभार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पालकांनी या घटनेची सखोल चौकशी करून संबंधित पुरवठादार, उत्पादन संस्था आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. तसेच सर्व साठ्याच्या तपासणीची मागणीही केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT