Nida Khan Pregnant pudhari
नाशिक

Nida Khan Pregnant: मी गरोदर आहे... TCS धर्मांतरण प्रकरणातील 'फरार' आरोपी HR निदा खानची जामीनासाठी कोर्टात धाव

Anirudha Sankpal

Nida Khan Pregnant: नाशिकमधील टीसीएस या प्रसिद्ध आयटी कंपनीत बळजबरीने धर्मांतर आणि महिलांचे लैंगिक शोषण केलं जात असल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणी कंपनीमध्ये एचआरचे काम करत असणाऱ्या निदा खान ही मुख्य आरोपी असून ती या सर्वांची मास्टर माईंड असल्याचा देखील आरोप केला जातोय. ही निदा खान गेल्या ११ दिवसांपासून फरार होती. तिच्या शोध घेण्यासाठी पोलीस पथकं राज्यातील अनेक ठिकाणी रवाना देखील झाली आहेत.

अटकपूर्व जामीन अर्ज दाखल

त्यातच आता निदा खान ही सध्या मुंबईत असून ती आपल्या पहिल्या मुलाला जन्म देण्याची शक्यता आहे अशी माहिती तिच्या कुटुंबियांकडून देण्यात आली आहे. खान सध्या फरार आहे. मात्र तिने स्थानिक नाशिक कोर्टात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला आहे. त्यात तिने आपल्या वैद्यकीय स्थितीचा प्रमुख आधार घेतला आहे. दरम्यान, तपास यंत्रणा या दाव्याची खातरजमा वैद्यकीय पथकामार्फत करून घेऊन तिला ताब्यात घेण्याची शक्यता आहे.

नाशिक टीसीएस धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणी पोलीस सध्या कंपनीतील ९ कर्मचाऱ्यांची चौकशी करत आहे. पोलिसांनी आतापर्यंत ७ कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. त्यात सहा पुरूष आणि महिला एचआर हेड आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. गेल्या आठवड्यात कंपनीतील आठ महिला कर्मचाऱ्यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे.

त्यात त्यांनी दावा केला आहे की कंपनीतील वरिष्ठ अधिकारी त्यांचे मानसिक आणि लैंगिक शोषण करत आहेत. एचआर विभागाने या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं आहे. या घटना फेब्रुवारी २०२२ आणि मार्च २०२६ मध्ये घडल्या आहेत.

यातील एका आरोपीने कर्मचाऱ्यासोबत शारीरिक संबंध देखील ठेवले होते. त्याने लग्नाचं खोटं वचन देऊन हे संबंध ठेवल्याचा आरोप संबंधित महिला कर्मचाऱ्याने केला आहे. आरोपीने यातील काही पीडित महिलांना चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला आणि तिच्या वैयक्तिक आणि वैवाहिक जीवनावरून लज्जा उत्पन्न होईल अशा टिप्पणी देखील केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT