nashik 
नाशिक

Neha Pawar Case | नेहा पवार आत्महत्या प्रकरणातील नवा धागा; जादूटोणा करणाऱ्या मांत्रिकाला अटक

Neha Pawar Case | पंचवटीतील नेहा पवार हिच्या आत्महत्येने संपूर्ण शहराला हादरवून सोडले होते. सात पानी चिठ्ठी लिहून केलेल्या या आत्महत्येमागे अनेक त्रास, मानसिक दबाव आणि अंधश्रद्धा यांचे सावट असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले होते.

पुढारी वृत्तसेवा

नाशिक: पंचवटीतील नेहा पवार हिच्या आत्महत्येने संपूर्ण शहराला हादरवून सोडले होते. सात पानी चिठ्ठी लिहून केलेल्या या आत्महत्येमागे अनेक त्रास, मानसिक दबाव आणि अंधश्रद्धा यांचे सावट असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले होते. नेहाच्या मृत्यूनंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (म.अ.ं.निस) तसेच अनेक सामाजिक संस्थांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी केली होती. त्यानुसार पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवत हिरावाडी येथून एका मांत्रिकाला अटक केली आहे. ही माहिती अंनिसचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी दिली.

नेहा पवार हिच्या आत्महत्येशी संबंधित असलेल्या विविध बाबींची छाननी करताना पोलिसांना एक महत्त्वाचा धागा मिळाला. आत्महत्येच्या कारणांमध्ये कौमार्य चाचणी, अंधश्रद्धा, तसेच जादूटोणा या गोष्टींचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले होते. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आणि महाराष्ट्र अंनिस यांनी विशेष हस्तक्षेप करत पोलिसांना या कोनातून तपास वाढवण्याची विनंती केली होती.

त्याप्रमाणे पोलिसांनी आरोपी संतोष पवार यांच्या घराची झडती घेतली असता जादूटोणाचे साहित्य मोठ्या प्रमाणात आढळले. घरातून नागाच्या आकाराचा खिळा, त्याला आरपार केलेला काळा बिबा, विविध प्रकारचे गंडेदोरे, ताईत, तसेच जादूटोण्यामध्ये वापरले जाणारे साहित्य मिळाले. हे साहित्य कुठून आणले, असा प्रश्न पोलिसांनी आरोपींना विचारला असता त्यांनी हिरावाडी परिसरातील एका भोंदूबाबाचे नाव सांगितले.

माहितीनुसार, मयत नेहा पवार हिच्या माहेरातून काही राखेसारखी भस्माची पुडी आणली होती. ही पुडी घरात अडचणी निर्माण करते, अशा प्रकारचे अंधश्रद्धाजन्य भय निर्माण करून तिच्यावर मानसिक दबाव आणण्यात आला होता. घरात समस्या येतात, त्यासाठी जादूटोणा करावा लागेल, असा भ्रम निर्माण करण्यात आNeha Pawar suicide, Nashik witchcraft arrest, Nashik police news, anti-superstition law Maharashtra, Hirawadi tantrik arrest, Nashik crime update, ANNIS Maharashtra, Panchavati suicide case, superstition crime Maharashtra, Neha Pawar investigationला. या सर्व गोष्टींनी नेहाची मानसिक अवस्था अधिकच बिघडत गेली, असे आरोपी संतोष पवार आणि जिजाबाई पवार यांनी कबूल केले.

या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक सुनील पवार यांनी हिरावाडी येथे राहणारा सुनिल बबन मुंजे (वय ४२) या मांत्रिकाला सोमवारी रात्री अटक केली. आरोपी मुंजे हा आपल्या घरातच "मंदिर" आणि "दरबार" चालवत असे. तो लोकांच्या समस्या दैवी वा अघोरी पद्धतींनी सोडवण्याच्या नावाखाली त्यांची फसवणूक करीत होता. चौकशीत त्याने जादूटोण्याशी संबंधित अनेक गोष्टी कबूल केल्या. पोलिसांनी त्याच्यावर जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत त्याला सहआरोपी केले आहे.

मंजूर सादरीकरणानंतर न्यायालयाने आरोपी मुंजेला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पंचवटी पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. आरोपीने किती लोकांना अशा प्रकारे फसवले? किती प्रकरणांमध्ये त्याने अंधश्रद्धाजन्य उपाय सांगून लोकांकडून पैसे उकळले? या सर्व मुद्द्यांवर आगामी चौकशीत अधिक खुलासे होण्याची शक्यता आहे.

अंनिसचे कृष्णा चांदगुडे म्हणाले,
“सदर भोंदुबाबाने आणखी कुणाला फसवले आहे का, याची सखोल चौकशी करावी. नागरिकांनी अशा अंधश्रद्धायुक्त प्रकारांपासून दूर राहावे. कुणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी तत्काळ अंनिस किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.”

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT