नाशिक

नाशिककरांनो महत्वाची बातमी ! निम्म्या शहरात ‘या’ दिवशी पाणीपुरवठ्याचा ‘मेगाब्लॉक’

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-रेल्वे आणि महावितरणच्या धर्तीवर नाशिक महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागानेदेखील दुरूस्तीविषयक कामांसाठी बुधवारी (दि. २७) पाणीपुरवठ्याचा 'मेगाब्लॉक' करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अंतर्गत सातपूर, सिडको व नाशिक पश्चिम विभागाचा पाणीपुरवठा बुधवारी बंद राहणार असून गुरुवारी (दि. २८) सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

सातपूर विभागातील शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्र येथे दुरुस्तीचे तसेच स्मार्ट सिटीमार्फत शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्र फिल्टर बेडचे वॉल बदलण्याचे, शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्रात यांत्रिकी तसेच इतर अनुषंगिक कामे करणे, अमृत मनी जलकुंभ भरणाऱ्या मुख्य जलवाहिनीची गळती बंद करणे, शिवाजीनगर मेघा इंडस्ट्रिज व संदीप प्लास्टिकच्या कंपाउंडलगतची ५०० मिलीमीटर व्यासाची पीएससी लाइन पाणीगळती बंद करणे आदी दुरुस्तीची कामे केली जाणार असल्यामुळे पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे.

या भागातील पाणीपुरवठा राहणार बंद

• सातपूर विभागातील सर्व प्रभाग व संपूर्ण परिसर प्रभाग क्रमांक आठ ते अकरा, २६ व प्रभाग क्रमांक २७ (भागश: परिसर) मधील चुंचाळे, दत्तनगर, माउली चौक.

• पश्चिम विभागातील प्रभाग क्रमांक सातमधील नहुष सोसायटी परिसर, पूर्णवादनगर, दादोजी कोंडदेवनगर, अरिहंत नरसिंग होम परिसर, आकाशवाणी टॉवर परिसर, तिरुपती हाउस परिसर, सहदेवनगर, सुयोजित गार्डन परिसर, आयचितनगर, गीतांजली सोसायटी, पंपिंग स्टेशन, शांतिनिकेतन आदी. प्रभाग क्रमांक बारामधील महात्मानगर जलकुंभ परिसर, पारिजातनगर, समर्थनगर, कामगारनगर, सुयोजित गार्डन, वनविहार कॉलनी, उत्कर्ष कॉलनी, लव्हाटेनगर, पत्रकार कॉलनी, पी.टी.सी. संभाजी चौक, उषाकिरण सोसायटी, क्रांतिनगर, श्रीमंडळ जलकुंभ परिसर, तिडके कॉलनी, राहुलनगर, मिलिंदनगर, कुटे मार्ग, चांडक सर्कल परिसर, तुपसाखरे लॉन्स परिसर, मातोश्रीनगर, सहवासनगर, कालिकानगर, गडकरी चौक व गायकवाडनगर परिसर इत्यादी.

• सिडकोतील प्रभाग क्रमांक २५ (भागश: परिसर) इंद्रनगरी परिसर, कामटवाडा, धन्वंतरी हॉस्पिटल कॉलेज परिसर, महालक्ष्मीनगर, दत्तनगर, मटालेनगर. प्रभाग क्रमांक २६ (भागश: परिसर) शिवशक्तीनगर, आयटीआय पुलाजवळील परिसर, बॉम्बे टेलर परिसर.

प्र.क्र. २७ (भागश: परिसर) चुंचाळे घरकुल योजना, दातीर मळा, अलीबाबानगर, अंबड मळे परिसर, प्रभाग क्रमांक २८ (भागश: परिसर) खुटवडनगर, माउली लॉन्स, वावरेनगर, अंबड गाव, महालक्ष्मी.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT