Loksabha election 2024 : ’सक्षम’ दिव्यांगांच्या मतदान हक्कासाठी..

Loksabha election 2024 : ’सक्षम’ दिव्यांगांच्या मतदान हक्कासाठी..
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने 40 टक्क्यांहून अधिक दिव्यांग असणार्‍या व्यक्तींसाठी आणि 85 वर्षे पूर्ण झालेल्या वयोवृद्धांना मतदान प्रक्रिया सुलभ होण्याच्या द़ृष्टीने सुरू केलेल्या 'सक्षम' अ‍ॅपच्या माध्यमातून अधिकच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत.

'सक्षम' अ‍ॅपवर दिव्यांग मतदारांसाठी दिव्यांग म्हणून नोंदणी करण्याची, नवीन मतदार नोंदणीसाठी, मत एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी हस्तांतरित करणे, मतदान केंद्र बदलाची व व्हीलचेअरची विनंती करता येत असून, मतदार यादीत नाव शोधण्याची, मतदान केंद्र जाणून घेणे, तक्रारी नोंदविणे, मतदान अधिकारी शोधणे, बूथ लोकेटर स्थिती तपासणे इत्यादी सुविधा दिल्या आहेत. दिव्यांग व्यक्तींसाठी सर्व ठिकाणी मतदान केंद्र तळमजल्यावर असतील.

तेथे पिण्याचे पाणी, प्रतीक्षा शेड, वैद्यकीय किट, सुलभ शौचालय, मतदान केंद्रांवर पुरेशी विद्युतरोषणाई, केंद्रांवर रॅम्प आणि व्हीलचेअरची सोय, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांसाठी प्राधान्याने प्रवेश सुविधा, स्वतंत्र रांगेची सुविधा, मानक चिन्हे आणि साइन बोर्ड, मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर घेऊन येण्याची व घरी सोडण्याची मोफत वाहतूक सुविधा, मतदान केंद्रावर स्वयंसेवक साहाय्य उपलब्ध असणार आहे. अंध आणि अशक्त मतदारांच्या मतांची नोंद करण्यासाठी ईव्हीएमवर ब्रेल लिपीची व मतदनिसाची सुविधा उपलब्ध आहे. वयोवृद्ध नागरिक आणि 40 टक्क्यांहून अधिक अपंगत्व व्यक्तींसाठी घरातून मतदानाची सुविधा देण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी कळविले आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news