शलाका सावंत आणि विद्या जोशी  Pudhari
नाशिक

Vishwa Marathi Sammelan Nashik | सातासमुद्रापार मराठी शाळेची घंटा; कॅनडा, अमेरिकेत हजारो मुले गिरवताहेत मराठीचे धडे

नाशिक येथे संमेलनासाठी आलेल्या विदेशी पाहुण्यांनी थेट शिकागो, टोरांटोमध्ये सुरू असलेल्या मराठी शाळांची भरभराट दै. 'पुढारी' बोलताना उलगडली

पुढारी वृत्तसेवा

Marathi schools in USA Canada

अंजली राऊत

नाशिक : महाराष्ट्रात मराठी शाळांच्या अस्तित्वाबाबत चिंतेचा सूर असतानाच माय मराठीचा गोडवा सातासमुद्रापार अमेरिका, कॅनडा सारख्या प्रगत देशातील नागरिकांनाही भावत असल्याची बाब विश्व मराठी संमेलनाच्या निमित्ताने समोर आली. या संमेलनासाठी आलेल्या विदेशी पाहुण्यांनी थेट शिकागो, टोरांटोमध्ये सुरू असलेल्या मराठी शाळांची भरभराट दै. 'पुढारी' बोलताना उलगडली. त्यामुळे मराठी शाळांची घंटा परदेशातही गुंजत असल्याची सकारात्मक बाब पुढे आली आहे.

नाशिक येथील केटीएचएम महाविद्यालय प्रांगणात कवी कुसुमाग्रज नगरीत संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी टोरांटो, कॅनडा येथू आलेल्या आणि मुळच्या मराठी भाषीक असलेल्या विद्या जोशी व अमेरिकेतील न्यूजर्सी शहरातून आलेल्या शलाका सावंत या सहभागी झाल्या होत्या. या दोघींचे मराठी भाषा प्रचार-प्रचारात वैश्विकस्तरावर मोलाचे योगदान आहे. दै. 'पुढारी'ने त्यांच्याशी साधलेल्या संवादात मराठी भाषेचा गोडवा केवळ महाराष्ट्रापुरताच नाही तर विदेशातील नागरिकांनाही असल्याचे त्यांच्या संवादातून समोर आले.

कॅनडातील टोरांटे शहरातून आलेल्या जोशी म्हणाल्या की, महाराष्ट्ररात मराठी भाषादिनानिमित्त शासनस्तरावर विविध उपक्रम राबवले जात असले येथील मराठी शाळांच्या स्थितीबाबत वाईट वाटते. मराठी शिकण्याची उत्सुकता विदेशी नागरिकांमध्ये देखील आहे. मी तीन वर्षे कॅनडामध्ये आणि आता बारा वर्षांपासून शिकागो येथे आहे. पंधरा वर्षांनंतर भारतात विश्व संमेलनाच्या निमित्ताने येण्याचा योग आला आहे.

आजोळ नाशिकरोडचे आहे. मी शिकागो येथे मराठी शाळा सुरू केली. २०१४ ते २०२१ या कालावधीत सुमारे ३०० विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. आजही उत्तम प्रकारे शाळा सुरू आहे. तसेच सध्या टोरांटो येथे मिल्टन मराठी असोसिएशनची मी सचिव म्हणून कार्यरत असून या असोसिएशनच्या सुनंदा टुमणे यांनी मराठी शाळा सुरू करण्यासाठी मोठे योगदान दिल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. आज या शाळांमधून सुमारे हजार मुले शिक्षण घेत असून परदेशात स्थायिक झालेल्या मराठी पालकांबरोबच स्थानिक नागरिक म्हणजेच विदेशी सुमारे २ टक्के अमराठी मुलेही असल्याचे त्यांनी सांगितले.

तर अमेरिकेतील न्यू जर्सी शहरातून आलेल्या शलाका सावंत या गत सहा वर्षांपासून मराठी विश्व संस्थेत बोर्ड ऑफ डायरेक्टर म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी न्यूजर्सी शहरात दोन मराठी शाळा कार्यरत असून संपूर्ण अमेरिकेत पाच ते सहा मराठी शाळा असल्याचे सांगत मराठी असल्याचे अभिमान व्यक्त केला. पुढील पिढीमध्ये भारतीय संस्कृतीची रुजवात व्हावी, यासाठी तेथेही दसरा, दिवाळी यांसारखे सण उत्साहात साजरे केले जातात. मराठी नाट्यप्रयोगांचे सादरीकरण तसेच मराठी भाषेवरील परिसंवाद आणि चर्चासत्रांचे आयोजन करून भारतीय मान्यवरांना निमंत्रित करून मराठीचा जागर सुरू असल्याचे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT