नाशिक

नाशिक : खालप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विमलबाई सुर्यवंशी

backup backup

देवळा, पुढारी वृत्तसेवा : खालप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विमलबाई सुमंत सूर्यवंशी यांची आज (दि. १५) बिनविरोध निवड करण्यात आली. तत्कालीन सरपंच मनीषा सूर्यवंशी यांच्यावर ११ पैकी ९ सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. यामुळे गेल्या पाच महिन्यंपासून खालप ग्रामपंचायतीचे सरपंचपद रिक्त होते. शुक्रवारी (दि .15) निवडणूक निर्णय अधिकारी मनोहर गांगुर्डे यांच्या  अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी सरपंच पदासाठी विमलबाई सुर्यवंशी व विजया देवरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

निर्धारित वेळेत विजया देवरे यांनी माघार घेतल्याने विमलबाई सूर्यवंशी यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. यावेळी उपसरपंच कांताबाई पिंपळसे, सदस्या विजया देवरे, बेबीताई सुर्यवंशी, सदस्य बाजीराव सुर्यवंशी, मुरलीधर आहिरे, सुनील सूर्यवंशी, सह यशवंत सुर्यवंशी, बारकु सुर्यवंशी, जिभाऊ सुर्यवंशी, आविनाश सूर्यवंशी, कैलास देवरे, शशिकांत सूर्यवंशी, प्रशांत सूर्यवंशी, भगवान आहीरे, काकाजी सुर्यवंशी, संभाजी सुर्यवंशी, केशव सुर्यवंशी, फुलाजी सुर्यवंशी, भिका सुर्यवंशी, प्रवीण सूर्यवंशी, भाऊसाहेब सुर्यवंशी, पोपट सूर्यवंशी, साहेबराव सूर्यवंशी आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवनिर्वाचित सरपंच विमलबाई सुर्यवंशी यांचे भाजपाचे जिल्हा नेते केदा आहेर, बाजार समितीचे सभापती योगेश आहेर ,वसाकाचे माजी संचालक आनंदा देवरे , बाजार समितीचे संचालक भाऊसाहेब पगार ,संभाजी आहेर , जितेंद्र आहेर , अतुल पवार आदींनी अभिनंदन केले. ग्रामपंचायतीच्या माझ्या सहकारी सदस्यांनी माझ्यावर विश्वास दाखवून माझी सरपंच पदी वर्णी लावली. खालप गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मी सर्वांना सोबत घेऊन कामकाज करणार असून , ग्रामस्थांच्यां विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही, आश्वासन नवनिर्वाचित सरपंच विमलबाई सुर्यवंशी यांनी दिले.

हेही वाचलंत का?

SCROLL FOR NEXT